उधळले महाशिवआघाडीचे मनसुबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:30 AM2019-11-23T00:30:33+5:302019-11-23T00:31:15+5:30

बहुमत नसतानाही सकारात्मक वातावरण निर्माण करून भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. विशेषत: मनसेचा थेट पाठिंबा मिळवतानाच कॉँग्रेस शिवसेनेबरोबर जाणार नाही याची पूर्णत: दक्षता घेतली आणि त्यामुळेच बाजी पलटली आणि सत्ता कायम राहिली.

 Overthrown Mahasiva front plans | उधळले महाशिवआघाडीचे मनसुबे

उधळले महाशिवआघाडीचे मनसुबे

Next

नाशिक : बहुमत नसतानाही सकारात्मक वातावरण निर्माण करून भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. विशेषत: मनसेचा थेट पाठिंबा मिळवतानाच कॉँग्रेस शिवसेनेबरोबर जाणार नाही याची पूर्णत: दक्षता घेतली आणि त्यामुळेच बाजी पलटली आणि सत्ता कायम राहिली.
शिवसेनेला सत्ता मिळविण्यासाठी भाजपच्या दहा ते बारा फुटिरांची साथ होती, तर त्यांना प्रामुख्याने कॉँग्रेस-राष्टÑवादी आणि मनसेचे पाठबळ मिळणार होते. त्यातील मनसेला सुरुवातीपासूनच बाजूला ठेवण्यात भाजपला यश मिळाले होते. त्यासाठी राज ठाकरे यांच्याशी भाजपच्या प्रदेश नेत्यांनी चर्चा केली आणि त्यांना यश मिळाले. राज ठाकरे यांनी निवडणुकीत भाजपवर सडकून टीका केली होती. त्यामुळे त्यांचा पाठिंबा मिळेल किंवा नाही याविषयी शंका होती.
मनसेपाठोपाठ भाजपने कॉँग्रेसला गळाला लावण्यासाठी चर्चा केली. त्यांना उपमहापौरपदासाठी आमिष दिल्याने वातावरण बिघडवले. मुळातच कॉँग्रेस पक्षात दोन गट होते. त्यातच उपमहापौरपदाच्या वादावरून सेना आणि कॉँग्रेसमध्ये बिनसले अखेरीस कॉँग्रेसने सेनेला सोडून भाजपला पूरक भूमिका घेतली. सर्वांत मोठी बंडखोरांची अडचणदेखील सोडविण्यात यश आले.
साम-दाम-दंड-भेद नितीचा वापर
भाजपने बंडखोरांना चुचकारले. साम-दाम-दंड-भेद नितीचा वापर केला खरा, परंतु शिवसेनेचे गणित जुळत नसल्याने मूळ पक्षाशी प्रतारणा करून कारवाईला सामोरे जावे लागण्यापेक्षा पक्षाबरोबर राहिल्याचे फळ मिळेल असे बंडखोरांना समजावण्यात आल्याने प्रश्न मिटला.
सानप यांच्याशीही भाजपची चर्र्चा
भाजप सोडून शिवसेनेत गेलल्या माजी आमदार बाळासाहेब सानप यांना त्यांच्यावरील अन्यायाचा बदला घ्यायचा होता. त्यासाठीच त्यांनी बंडाची तयारी करण्यास नगरसेवकांना सांगितले. मात्र, भाजपच्या नेत्यांनी सानप यांच्याशी चर्चा केल्याचे वृत्त आहे.
उमेदवारीमुळेच भाजपतील बंड झाले थंड
मनपा निवडणुकीत शिवसेनेला साथ देणाऱ्या संभाव्य नगरसेवकांची संख्या दहा ते बारा असल्याचे सांगितले जात होते. त्यातच उमेदवारी अर्ज दाखल करताना सानप समर्थक नगरसेवक कमलेश बोडके यांनी तर थेट शिवसेनेत प्रवेश केल्याचे जाहीर केले होते. मात्र शुक्रवारी (दि.२२) ते थेट भाजपतच असल्याचा दावा करू लागले. भाजपात बाहेरून आलेल्यांनाच सत्तापदे दिली जात आहे. पक्षातील जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी, अशी आमची मागणी होती आणि ती पूर्ण झाल्याने भाजपबरोबरच असल्याचा दावा बोडके यांनी केला. निवडणुकीच्या वेळी बोडके, मच्छिंद्र सानप आणि तत्सम सर्वच कथित बंडखोर नगरसेवक एकाच वेळी दाखल झाले.
सर्वच पक्षांत
राजी-नाराजीचे वातावरण
महापौरपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच पक्षांत गटबाजीचे वातावरण होते. भाजपने ज्येष्ठ नगरसेवकाला न्याय दिल्याचे स्वागत होत असताना काही नगरसेवक उमेदवारीत डावलल्याने नाराजी व्यक्त करीत होते, तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये पाठिंबा शिवसेनेला द्यायचा की भाजपला यावरून दोन गट पडले होते. एका गटाने दुसºया नगरसेवकांना अंधारात ठेवून बोलणी केल्याने त्याविषयीचे पडसाद पक्षात उमटले. मनसेतदेखील भाजपला पाठिंबा देण्यावरून दोन गट पडले होते.

Web Title:  Overthrown Mahasiva front plans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.