नाशिक : नोकरदार म्हणून शरणपुररोडवरील संजीव रघुनाथ नवाल यांच्याकडे धीरज मत्सागर नावाने नोकरी करणाºया भामट्याने त्यांना साठ हजारांना गंडा घातला होता. भद्रकाली पोलिसांनी त्यास अटक केली असून त्याचे अस्सल नाव रतेश विश्राम कर्डक (३२, रा.पेठरोड) असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित रतेश हा नवाल यांच्याकडे खोट्या नावाने नोकरीस होता. त्याने मालकाचा विश्वास संपादन करत मोठ्या शिताफिने त्यांच्या बॅँकखाते असलेले धनादेश चोरुन त्यावर नवाल यांची बनावट स्वाक्षरी करुन सुमारे साठ हजार रुपयांना गंडविले होते. याप्रकरणी त्यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयित नोकराविरुध्द फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपासचक्रे फिरवून संशयितास ठाणे जिल्ह्यातील नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेतले आहे. संशयित रतेश हा वर्तमानपत्रातील जाहिराती बघून बिल्डर्स व डेव्हलपर्स यांच्या कार्यालयात शिपाई अथवा चालक म्हणून खोटे नाव सांगत नोकरी मिळवत होता. काही दिवस नोकरी करुन मालकाचा विश्वास जिंकल्यानंतर त्यांचे धनादेश चोरी करुन मालकांच्या स्वाक्षºयांशी जुळणाºया बनावट स्वाक्षºया करुन रकमेचा अपहार करण्याचा अवैध प्रकार हा करत असल्याचे तपासातून पुढे आले आहे. त्याच्यावर याअगोदरही अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहे. भद्रकाली, गंगापूर, अंबड पोलीस ठाण्यात अनुक्रमे तीन, दोन, एक असे गुन्हे संश्यित रतेशवर दाखल आहेत.
मालकाला साठ हजारांना गंडविणाऱ्या नोकराला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 10:14 PM
नाशिक : नोकरदार म्हणून शरणपुररोडवरील संजीव रघुनाथ नवाल यांच्याकडे धीरज मत्सागर नावाने नोकरी करणाºया भामट्याने त्यांना साठ हजारांना गंडा घातला होता. भद्रकाली पोलिसांनी त्यास अटक केली असून त्याचे अस्सल नाव रतेश विश्राम कर्डक (३२, रा.पेठरोड) असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित रतेश हा नवाल यांच्याकडे ...
ठळक मुद्देसंशयित रतेश हा नवाल यांच्याकडे खोट्या नावाने नोकरीस होता.बनावट स्वाक्षरी करुन सुमारे साठ हजार रुपयांना गंडविले होते.