डिजीपीनगर परिसरात राहणाऱ्या बच्छाव कुटुंबातील देवाजी बच्छाव यांना कोविडची लक्षणे जाणवू लागल्याने कुटुंबीयांची उपचारासाठी धावपळ सुरू होती. त्यांनी शहरासह चांदवडपर्यंत असलेल्या सर्व कोविड रूग्णालयांची चौकशी केली. परंतु, वाढत्या रूग्णसंख्येमुळे त्यांना कुठेही बेड उपलब्ध झाला नाही. त्यातच रूग्णाची ऑक्सिजन पातळीही खालावली. ही बाब राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कडलग यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ मदत केंद्राचे प्रमुख तुषार जगताप यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सोबत असलेले ऑक्सिजनचे राखीव सिलिंडर घेऊन रूग्णाच्या मदतीसाठी धाव घेतली. गंगापूररोड वरील विद्याविकास सर्कल जवळ बच्छाव कुटुंबीयांच्या गाडीत ते सिलिंडर लावून रूग्णाला त्याक्षणी अत्यावश्यक असलेला ऑक्सिजन पुरवठा सुरू केला. वेळेवर ऑक्सिजन मिळाल्याने बच्छाव कुटुंबास बेडचा शोध घेण्यासाठी वाढीव वेळ मिळाल्याने तरूणांनी एकत्र येऊन उभे केलेल्या छत्रपती वैद्यकीय मदत केंद्राचे काम लक्षवेधी ठरत आहे.
===Photopath===
220421\22nsk_51_22042021_13.jpg
===Caption===
श्रीमंत संभाजीराजे छञपती वैद्यकीय मदत कक्षाकडून पुरविण्यात आलेल्या ऑक्सीजनच्या साह्याने श्वास घेणारे रुग्ण