वाढत्या रुग्णांसाठी ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये व ऑक्सिजन पुरवठा सुरळीत व अखंडित राहण्यासाठी हा ऑक्सिजन टँक उपयोगी ठरेल. या टँकला दररोज रिफील करण्याची गरज नसून दर पंधरा दिवसातून एकदा टँकरव्दारे याचे रिफील करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.हितेश महाले यांनी दिली आहे.
सामान्य रुग्णालयात सध्या उपयोगात असलेले ऑक्सिजन सिलिंडर व ड्युरा सिलींडरच्या रिफिलसाठी त्यांची नाशिक किंवा औरंगाबाद येथे वाहतुक करावी लागते. यामध्ये वाहतुक खर्चासह वेळेचा व मनुष्यबळाचा अपव्यय होत असून सामान्य रुग्णालयातच २० के.एल.चा ऑक्सिजन टँक बसविल्यानंतर वाहतुक खर्चासह वेळेची व मनुष्यबळाची देखील मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. तर हायफ्लो नेझल ऑक्सिजन व बायपॅप नेझल ऑक्सिजन प्रणाली यावर उत्तम प्रकारे कार्यरत राहून रुग्णांना सुरळीत व अखंडित ऑक्सिजनचा पुरवठा होणार असल्याचे भुसे यांनी सांगितले
इन्फो
गंभीर रुग्णांसाठी उपयुक्त
ऑक्सिजन टँकमुळे अत्यवस्थ रुग्णांसाठी ३० लीटर प्रति मिनिट पेक्षा अधिक ऑक्सिजनची गरज भासल्यास या माध्यमातून ७० लीटर प्रति मिनिट ऑक्सिजनचा पुरवठा होवू शकतो. यामुळे गंभीर रुग्णांसाठी ही प्रणाली उपयोगी ठरू शकते, असा विश्वासही डॉ.महाले यांनी व्यक्त केला.