यासंदर्भात सर्व प्रकरणाची गुरुवारी (दि. २४) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात येईल, अशी माहिती स्थायी समितीचे सभापती गणेश गीते यांनी दिली.
गेल्यावर्षी ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडत असताना महापालिकेने २२ सप्टेंबर २०२० रोजी निविदा प्रक्रिया पूर्ण हा प्रस्ताव स्थायी समितीवर मांडण्यात आला. महापालिकेच्या बिटको रुग्णालयात २० तर डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात १० केएलच्या टाक्या बसविण्याचा प्रस्ताव होता. त्यानुसार महापालिकेने केवळ टाकीच नव्हे तर सिलिंडर भाड्याने घेतले असून दहा वर्षे कालावधीसाठी सुमारे लाख रुपये भाड्याने ठेका दिला. दर तीन वर्षांनी त्यातही दरवाढ करण्याचीही अट आहे. विशेष म्हणजे दहा वर्षांनी मुदत संपल्यानंतर या टाक्याही ठेकेदार परत घेऊन जाणार आहे. विशेष म्हणजे १० केएलच्या टाकीची किंमत अवघी वीस ते बावीस लाख आहे. मात्र, तरीही इतक्या कमी रकमेच्या टाकी खरेदीऐवजी दहा वर्षे ठेकेदाराला पोसण्याचे कारण काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. या ठेक्यासाठी हट्ट धरणारे काही अधिकारीदेखील त्यामुळे रडारवर आले आहेत.
कोट..
झाकीर हुसेन रुग्णालयतील गळती प्रकरणी ज्यांनी ऑक्सिजन टँक बसविला त्या कंपनी अधिकारी तसेच ज्यांनी टँक बसवून घेतला ते अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच ज्यांच्याकडे वैद्यकीय विभागाचे कामकाज आहे ते अतिरिक्त आयुक्त अशा सर्वांची या प्रकरणी चौकशी करण्यात येईल.
- गणेश गीते, सभापती, स्थायी समिती, मनपा