नाशिक- सुमारे वीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या ओझर येथील हॉलकॉन कार्गो प्रकल्पाला अच्छे दिन येणार आहेत. शारजाह विमानतळ प्राधीकरणाने नाशिकला हवाई मालवाहतूकीचे नवीन डेस्टीनेशन म्हणून घोषीत केले आहेे. त्यामुळे नाशिकच्या कार्गो सेवेचे देशपातळीवर महत्व वाढणार आहे.
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात शेतमाल आणि प्राण्यांची निर्यात करणे शक्य होणार आहे. शारजा विमानतळ प्राधीकरणाने जगातील तीन न्यु एअर कार्गो डेस्टीनेशन म्हणून घोषीत केले आहेत यात नाशिकमधील अेाझर तसेच रवांडा येथील किगाली आणि अमेरीकेतील ह्युस्टन यांचा समावेश आहे. नाशिकला आता व्यावसायिक मालवाहतूकीसाठी महत्व देण्यात आल्याने भविष्यात येथून शेतमाल आणि शेळी, मेंढ्यांसारखे प्राणी निर्यात हेाण्याची शक्यता आहे तर शारजा सारख्या ठिकाणाहून नाशिकमध्ये सुकामेवा आणि अन्य साहित्य आणले जाऊ शकते.