ठळक मुद्देओझरसह परिसरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या एकूण ४६३५
ओझर टाऊनशिप : ओझरसह परिसर सलग तीन दिवसांपासून एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नव्हता. त्यामुळे ओझरकरांना काहीसा दिलासा मिळत असतानाच गुरुवारी (दि. १०) पुन्हा २ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.ओझरसह परिसरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या एकूण ४६३५ झाली आहे. पैकी १०२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. ४५२१ रुग्ण बरे झाले असून, १२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परिसरातील एकूण कंटेनमेंट झोन संख्या २२०१ झाली असून २१९२ झोन पूर्ण झाले तर ॲॅक्टिव्ह झोन ९ असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.