ओझर : जिल्ह्यातील दि ओझर मर्चट को आॅप बॅकेच्या आयडीबीआय बॅकेतील चालू खात्यातुन आरटीजीएस व एनईएफटीव्दारे आय एमपीएस व नेट बँकिंगच्या माध्यमातून बॅकेचे अकांऊट हॅक करून एक कोटी ३५ लाख ९६ हजार ४२७ रूपयांना गंडा घातल्याची फिर्याद बॅकेचे कर्मचारी साईनाथ पवार यांनी ओझर पोलीस ठाण्यात दिली आहे. दरम्यान, तपासाची चक्रे तातडीने फिरल्यानंतर सहा जणांना मिझोरम, दिल्ली, गुवाहटी येथे ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त असून सुमारे ७४ लाख रुपये थांबविण्यात बॅँकेला यश आले आहे.दि ओझर मर्चट को आॅप बॅकेचे येथील आयडीबीआय बॅकेच्या ओझर पिंपळगाव व एम.जी. रोड नाशिक येथे खाते आहे. दि ७ जुन रोजी सायंकाळी पाच वाजता बॅक बंद होण्यापुर्वी शाखाधिकारी यांनी क्लोजिंग बॅलंन्स तपासुन बॅकेचे मुख्य शाखेचे प्रशासकिय अधिकारी सुनील भालेराव यांना आॅनलाइन सॉफ्टवेअरव्दारे दिला. दि. ८ व ९ रोजी शनिवार व रविवार सुटी असल्याने बॅक बंद होती. सोमवार दि १० रोजी सकाळी दहा वाजता आयडीबीआय बॅक शाखा एमजी रोड नासिक येथून ओझर मर्चट बॅक शाखा पंचवटी नासिक येथील शाखाधिकारी वैभव जाधव यांना फोन वरून सुटीच्या दिवशी बॅकेच्या झालेल्या व्यवहाराविषयी माहीती दिली. पंचवटी शाखेचे शाखाधिकारी वैभव जाधव यांनी गेले दोन दिवस बॅकेला सुट्टी असल्याने व्यवहारच झाला नसल्याचे आयडीबीआयच्या शाखाधिकाऱ्यांना सांगितले. ओझर मर्चट बॅकेचे आयडीबीआय बॅकेत असलेले सर्व खाते तपासले असता अज्ञात इसमानी १ कोटी ३५ लाख ९६ हजार ४१७ रुपये इतकी रक्कम वेगवेगळ्या खात्यांमध्ये आय.एम. पी. एस. व इंटरनेट बँकिंग च्या माध्यमातुन वर्ग केलेली दिसली. नेट बॅकिंग च्या माध्यमातुन बँकेला गंडा घातल्याचे लक्षात आल्यानंतर बॅकेचे कर्मचारी साईनाथ पवार यांनी ओझर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सायबर पोलीस करीत आहेत.---------------------------------सहा इसम ताब्यातज्या अज्ञात इसमांनी ओझर मर्चट बॅकेचे अकांऊट हॅक करीत बॅकेला गंडा घातला त्यातील सहा इसमांना मिझोराम, गुवहाटी, दिल्ली येथे तेथील पोलीसांनी तातडीने ताब्यात घेतल्याची माहीती समोर येत असुन सदर पैसे कोण कोणत्या खात्यात वर्ग झाले याची देखील माहीती बॅकेच्या हाती आली आहे. बॅकेचे संचालक मंडळ रात्री उशिरापर्यंत आयडीबीआय बॅकेच्या वरीष्ठ अधिका-यांच्या संपर्कात होते.----------------------बॅकेला दोन दिवस सुट्टी असल्याने हा प्रकार घडला असुन या बाबतची माहिती मिळताच बॅकेने तातडीने पाऊले उचलत आयडीबीआय च्या वरीष्ठ अधिका-यांशी संपर्क साधत हस्तांतरित झालेल्या रक्कमेपैकी ३४ लाख रूपये व आय.एम.पी. एस. कडे हस्तांतरित झालेले ४० लाख रूपये असे एकुण ७४ लाख थांबविण्यात बॅकेला यश आले असुन बॅकेचे संचालक मंडळ आयडीबीआय बॅकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात आहे. उर्वरित रक्कम देखील लवकरच सायबर पोलिसांच्या माध्यमातून परत मिळवू.-नवनाथ मंडलिक, चेअरमन, ओझर मर्चट बॅक.
ओझर मर्चट बँकेस सव्वा कोटीला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 4:10 PM