ओझर : परिसरात रोडरोमियोंचा वाढलेला त्रास तसेच कायद्याची पर्वा न बाळगता वाहतुकीचे नियम धाब्यावर बसून ट्रिपल, चार सीट, मुख्य बाजारपेठ, मेनरोड परिसरात बेशिस्त वाहतूक कोंडी करणाऱ्यांवर पोलिसांनी गुरु वारी सकाळी कारवाई केली. एच.ए.एल कॉलेज, टिळक नगर येथिल कॉलेज परिसरात पोलिसांनी विद्यार्थ्यांना जाब विचारला. दुचाकी चालवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईच्या मोहीम हाती घेतल्यानंतर रोडरोमियोंची चांगलीच दमछाक झाली. तर विविध वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करत दंड वसूल करण्यात येत आहे. ओझर व परिसरात काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर आवाज करणा-या धूमस्टाईल दुचाकी चालविण्याचे प्रमाण मोठयÞा प्रमाणात वाढले होते. त्यात सायंकाळी गर्दीच्या ठिकाणी मेनरोड, बसस्थानक शहराच्या मुख्य रस्त्यावर व परिसरातील शिवाजी नगर,पंडीत कॉलनी, साईधाम याठिकाणी जोरजोरात आवाजात हॉर्न वाजवत रोडरोमिओंचा त्रास सर्वसामान्य होत होता. या सर्वांचा होणारा त्रास लक्षात घेत ओझर पोलिस स्टेशनतर्फे तातडीने पावले उचलत या रोडरोमिओंवर कारवाई करण्यास सुरु वात केली आहे. ओझर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे अरु ण गायकवाड, भूषण शिंदे, संतोष ब्राम्हणे, बाळाकदास बैरागी, बाळासाहेब पानसरे, एकनाथ हळदे, जालिंदर चौघुले,भास्कर पवार,अनुपम जाधव, बंडू हेंगडे, विश्वनाथ धारबळे, आदी धडक कारवाईची मोहीम हातात घेतली. परिसरातील ठराविक ठिकाणी गस्त घालून ओझर गाव व परिसरात चोरीचे प्रमाण वाढले होते, त्याला आळा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.
ओझर पोलिसांची रोडरोमियोंवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 1:28 PM