जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील ओझर विमानतळ ते दहावा मैल या चार किलोमीटर रस्त्यावर दिवे नसल्याने या रस्त्यावर रात्रीच्या वेळेस अतिशय काळोख असतो. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बांधकाम विभागाने ओझर विमानतळ ते दहावा मैल या मार्गावर पथदीप बसवावे, अशी मागणी केली जात आहे.विमानतळाचे बांधकाम अनेक दिवसोपूर्वी झाले असून, दहावा मैल ते विमानतळ असा चार किलोमीटरचा चार पदरी रस्ता बनवलेला आहे. या रस्त्याला मध्यभागी दुभाजकही बसवलेले आहेत. परंतु या मार्गावर पथदीप नसल्याने रात्रीच्या वेळेस अंधार असतो. त्यामुळे अनेक प्रवाशांना रात्रीच्या वेळेस वाहन चालवताना त्रास सहन करावा लागतो. विमानतळावरून अनेक राज्यात विमानांची उड्डाणे होत असतात. तसेच अनेक कंपन्यांचे प्रवासी विमानांचेही उड्डाण सुरू आहे. प्रवाशांना या रस्त्याने नाशिक, शिर्डी, मुंबई या ठिकाणी रात्रीच्या वेळेस जावे लागतात. महिन्यातून दोन ते तीन वेळेस विमानतळ ते दहावा मैल या मार्गाने अनेकदा व्हीआयपी, मंत्री, लोकप्रतिनिधीही जात येत असतात. त्यावेळी या मंत्रिमहोदयांची सुरक्षा करण्यासाठी पोलीस कर्मचारी दोन दिवस अगोदरच या रस्त्याच्या ठिकाणी अंधारात उभे किंवा बसून असतात. त्यामुळे या रस्त्यावर बांधकाम विभागाने पथदीप बसवावे, अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.ओझर विमानतळ ते दहावा मैल या चार किलोमीटरच्या रस्त्यावर दिवे बसवण्याची मागणी बांधकाम विभागाकडे अनेक वेळा केली असून, वेळोवेळी ग्रामपंचायतीने निवेदनही पाठवलेले आहे. परंतु बांधकाम विभागाकडून दखल घेतली जात नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या रस्त्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर पथदीप बसवावेत.-विष्णुपंत काठे, माजी उपसरपंच, जानोरीफोटो- २८ नाशिक एअर
ओझर विमानतळ-दहावा मैल मार्ग काळोखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2021 11:21 PM
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील ओझर विमानतळ ते दहावा मैल या चार किलोमीटर रस्त्यावर दिवे नसल्याने या रस्त्यावर रात्रीच्या वेळेस अतिशय काळोख असतो. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बांधकाम विभागाने ओझर विमानतळ ते दहावा मैल या मार्गावर पथदीप बसवावे, अशी मागणी केली जात आहे.
ठळक मुद्देप्रवाशांची गैरसोय : पथदीप बसविण्याची ग्रामस्थांची मागणी