शहरं
Join us  
Trending Stories
1
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
2
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
3
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
4
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
5
Kolkata Doctor Case : "२४ तासांत मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करू", डॉक्टरांचा ममता सरकारला अल्टिमेटम
6
माजी खासदाराची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी; अवघ्या २ वर्षात परतले माघारी
7
१० मिनिटांत घरी पोहोचणार गरमागरम जेवण, Swiggy नं सुरू केली नवी सेवा; मुंबई-पुण्यासह 'या' ठिकाणी घेता येणार लाभ
8
Navratri Special : "शेतकरी नवरा नको गं बाई" हा दृष्टिकोन बदलण्याची गरज, अभिनेत्री असलेली मृण्मयी शेतीकडे का वळली?
9
Bigg Boss 18 ची उत्सुकता शिगेला! सलमानने डॅशिंग एन्ट्री घेऊन दाखवला अनोखा अंदाज, बघा व्हिडीओ
10
मनसेचं 'मिशन महाराष्ट्र'! राज ठाकरे आज मराठवाड्यात; त्यानंतर नाशिक, पुणे दौरा करणार
11
राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करताच हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल, काय म्हटलंय?
12
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
13
Jio Financial ला SEBI नं दिली गूड न्यूज, आता शेअरवर नजर; काय परिणाम होणार?
14
Irani Cup 2024 : अजिंक्य की ऋतुराज? MUM vs ROI मॅच ड्रॉ झाली तर कोण उचलेल ट्रॉफी?
15
संतापजनक! "पप्पा वाचवा..." ओरडत पळाल्या मुली; शाळेतून परतताना तरुणांनी काढली छेड
16
Virat सह अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ बनवून होतेय फसवणूक; बनावट गेमिंग अ‍ॅपद्वारे कोट्यवधींची लूट
17
'तुम्ही मनी लॉड्रिंग, मानवी तस्करीत...", वैज्ञानिकाला एक व्हिडीओ कॉल अन् गमावले ७१ लाख
18
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
19
IND vs NZ सामन्यात 'चिटिंग'? आर. अश्विननंही केली 'चॅटिंग', पण...
20
अमेठीत घडलं 'बदलापूर', आरोपी गंभीर जखमी! पोलिसाची रिव्हॉल्वर हिसकावताना घडली घटना

ओझरला दुकानांसमोर मद्यपींची पुन्हा गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2020 10:31 PM

ओझर : शासनाने मद्यविक्रीला पुन्हा सशर्त परवानगी देताच मद्यविक्रीच्या दुकानांसमोर भर उन्हात हातात फॉर्म घेऊन मद्यपींच्या रांगा लागल्या. त्यामुळे रस्त्यावर जत्राच भरल्याचे चित्र दिसून आले.

सुदर्शन सारडा ।लोकमत न्यूज नेटवर्कओझर : शासनाने मद्यविक्रीला पुन्हा सशर्त परवानगी देताच मद्यविक्रीच्या दुकानांसमोर भर उन्हात हातात फॉर्म घेऊन मद्यपींच्या रांगा लागल्या. त्यामुळे रस्त्यावर जत्राच भरल्याचे चित्र दिसून आले.गेल्या दीड एक महिन्यापासून राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे सर्वच उद्योगधंद्यांना ब्रेक लागला होता. त्यात सर्वात जास्त चर्चिला गेला तो म्हणजे मद्यविक्र ीच्या दुकानांचे टाळे कधी उघडणार? सरकारने एक दिवस ट्रायल करून पाहिल्यावर परिस्थिती हाताबाहेर गेली तर फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला होता. परिणामी देर आए दुरु स्त आए म्हणत शासनाने पुन्हा मद्यविक्रीला परवानगी दिली. मद्यपींना मद्य विकत घेताना बँकेसारख्या स्लिपा पहिल्यांदाच भरून द्याव्या लागल्या. देशी विकत घेणाऱ्या वीरांना सावलीत आल्यावर आपण बँकेत तर नाहीना आलो असा होरा होत होता. तर यात तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वच वयोगट सामील झाल्याने अनेक गावकऱ्यांना दोन्ही दुकानांकडे पाहून महामार्गावरील यात्रेची आठवण झाली. यात तळपत्या उन्हात कुणालाही चक्कर आली नाही तर कुणाचेही कुणाशी शब्दानेसुद्धा भांडण नाही. एरवी पेट्रोल भरताना, बँकेत पैसे काढताना आदी ठिकाणी कधीकधी नागरिक जे भांडण करतात त्यांनी यातून खरा बोध घेतला असणारच यात कुठलीही शंका नाही. सायंकाळी कट्ट्यावर एकच चर्चा रंगत आहे अर्थव्यवस्थेचे पुढे कसे होणार? त्यांना सदर रांगा व उलाढाल बघून उत्तर मिळालेले असेल हेदेखील तितकेच खरे. पोलीस, उत्पादन शुल्क विभागदेखील इतक्या गर्दीपुढे पुरते हतबल झाले होते. आधीच पोलिसांची संख्या कमी, त्यात काही जण मालेगावी बंदोबस्ताला तर उरलेल्यांमध्ये लाख लोकांना सांभाळायचे म्हटल्यास ते पण कुठे कुठे लक्ष देणार हे ध्यानात ठेवत मद्यपींनी शिस्तीचा एक वेगळा पायंडा पाडला.------‘जनधन’चे पैसे घेण्यासाठी महिलांची बँकेत गर्दीएकीकडे मद्यपींची गर्दी तर दुसरीकडे पंतप्रधान जनधनखात्यात दुसºया महिन्याचे पाचशे रु पये जमा झाल्याने ते काढण्यासाठी गोरगरीब महिलांना तासन्तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागले. विशेष म्हणजे मद्यपींना मद्य घेताना फॉर्म भरावा लागत होता तर इकडे महिलांनादेखील स्लिप भरून अंगठ्याचा ठसा देऊन पैसे मिळत होते. दोन्ही रांगा समांतर असताना रांगेतल्या महिलांचे तोंड गावाकडे, तर पुरुषांचे तोंड महामार्गाकडे असल्याने त्यातील एकजण सरकारला महसूलरूपी पैसे देत होता, तर दुसरीकडे संसाराची चिंता होती.

टॅग्स :Nashikनाशिक