ओझर : नाशकातून जाणा-या भारताच्या सर्वात महत्त्वाचा मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाचे सौंदर्य सध्या आजूबाजूच्या कचºयामुळे पूर्णपणे हिरावून गेल्याने स्थानिक वाहनचालकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे प्रदूषणदेखील वाढत चालले आहे.लॉकडाउन जाहीर झाल्यापासून मुंबईहून उत्तरेकडे पायी जाणाऱ्यांनी महामार्ग ओसंडून गेला होता. ठिकठिकाणी शेकडो नागरिकांनी दातृत्वाची भावना मनात ठेवून सढळ हाताने दिलेले जेवण, चहा, नास्ता भरपेट दिला गेला. त्यांना अनेक ठिकाणी निवारादेखील उपलब्ध करून दिला; परंतु या यानंतर मात्र महामार्गावरील पायी लोंढे थांबले तेव्हा स्वच्छतेकडे दुर्लक्षच होत गेल्याचे चित्र समोर आले. आधीच भर उन्हाळ्यात लागलेल्या लॉकडाउनमुळे दुतर्फा लोखंडी जाळ्यात लावलेली झाडे पाण्याअभावी वाळून गेली तर आता त्याला घाण कचºयाचा विळखा पडला. त्यामुळे त्यातील आहे तो जीव जाण्याची भीती व्यक्त होत आहे.नाशिक, ओझर, पिंपळगाव, चांदवड, मालेगाव तर पुढे धुळे जिल्ह्याच्या पलीकडेदेखील महामार्गवर ठिकठिकाणी पडलेला कचरा जुने दिवस आठवल्याखेरीज राहत नाही. आज सरकार इतके पैसे स्वच्छ भारत अभियानावर खर्च करत असताना त्याला सडके ले जाती हे समृद्धी की ओर हे बिरु द मिरवणाºया प्राधिकरणाने केराची टोपली दाखवली आहे. आधीच झाडे लावण्याचे प्रयत्न काहीसे शिथिल झाल्याने आहे ते टिकवण्याची धडपड करण्याचे आव्हान समोर असताना महामार्गवरील बाजूच्या झाडांऐवजी नुसता कचरा दिसत असेल तर त्याला वेळीच स्वच्छ करणे गरजेचे बनले आहे. यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था समाजामध्ये काम करत आहे. त्यांनी या गंभीर गोष्टीकडे लक्ष्य दिल्यास आपल्या महामार्गचे गतवैभव पुन्हा मिळेल हे मात्र नक्की.-----------गोंदे ते पिंपळगाव सहापदरी तर सर्व्हिस रोड असा दहा पदरी रस्ता आहे. साधारण या दीडशे किमीसाठी जवळपास साडेतीनशे रु पये टोल आकारला जातो. मोठ्या गाड्यांना तर हजारच्या घरात जातो. लॉकडाउनपूर्वी स्वच्छता व निगा वेळोवेळी राखली जात होती. आता लॉकडाउनच्या चौथ्या चरणात अनेक बाबींना शिथिलता मिळाली असता याच महामार्गची निगा पूर्वीसारखीच करावी, अशी अपेक्षा भरमसाठ टोल भरणाºया वाहनधारकांनी केली आहे.
ओझरला महामार्ग परिसरात कचऱ्याचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 8:50 PM