ओझर : स्थानिक पातळीवर कोरोना आटोक्यात न आल्यास केवळ अत्यावश्यक वाहनांना परवानगी मिळणार असून नियम मोडणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल केले जातील. या कठीण समयी नियम पळून स्वतः बरोबरच कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले.ओझर येथे कोरोना आढावा बैठक व रूट मार्च प्रसंगी पाटील यांनी गावातील निवडक नागरिकांबरोबर चर्चा केली.
यावेळी ओझर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गावातील रुग्ण संख्येचा आढावा तसेच त्यावरील काय उपाययोजना कोणत्या प्रकारे होत आहे याचा गाव निहाय आढावा घेतला. पोलीस बंदोबस्त तैनात ठेवणार आहे. तर प्रत्येकाच्या कुटुंबातील काळजी स्वतः घेतली तरच कोरोनाला आळा बसेल. त्यामुळे बेवारसपणे रस्त्यावर फिरणाऱ्यांची आता अँटिजेन चाचणी करणार असून कोरोनाबाधिताच्या घराबाहेर असलेल्या फलक जरी कुणी काढला तरी त्यांच्यावर कारवाही केली जाणार आहे. त्यामुळे सर्वांची काळजी जशी पोलीस घेतात तशी आपली स्वतःची देखील जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले,पोलीस निरीक्षक अशोक रहाटे,सर्कल अधिकारी प्रशांत तांबे,तलाठी उल्हास देशमुख,
प्रकाश महाले,नितीन काळे,श्रीकांत अक्कर,बाबा पठाण,रवींद्र जाधव,विशाल मालसाने, गणेश धोत्रे,महेश गाडगे,डॉ.योगेश्वर चौधरी,सुनील राऊत,सचिन कायस्थ,अंबादास शेलार यांच्या सह ओझरकर नागरिक उपस्थित होते.------------------
‘त्या’ सेवकांचा सत्कारओझरमध्ये कोरोना संख्या वाढत असल्याने अनेक बाधित घरीच क्वारंटाईन झालेले आहे.त्यात गावातील काही तरुणांनी पुढे येत घरपोच मोफत जेवण देण्याचे कार्य सुरू केले आहे.तसेच अंत्यविधी व दफनविधीसाठी गावातील काही तरुणांनी पुढाकार घेत मृतदेह रीतिरिवाजपणे विलीन करण्याचे कार्य हाती घेतले. अशा सेवकांचे पाटील यांनी कौतुक करत सन्मान केला. अकबरी मस्जिद येथील विश्वस्त व मौलाना यांना भेटून रमजान पर्वात घरीच नमाज अदा करण्याचे आवाहन केले.
-----------------आधी कारवाईचा दंडा, नंतर ॲटिजनचा फंडा
ओझरमध्ये मोकाट फिरणाऱ्यांना आता लगाम बसणार आहे. शहरात दुचाकीवर तसेच इतरत्र रिकाम्या फिरणाऱ्यांना पोलिसांकडून अगोदर कारवाई करत दंड आकारत आहे. त्यानंतर सदर युवकांची ॲटिजेन टेस्ट करतात. टेस्ट पॉझिटीव्ह आली तर थेट कोविड सेंटरला पाठविण्याचा फंडा पोलिसांनी राबविला आहे.