ओझरटाऊनशिप : सायखेडा फाटा ओझर येथे असलेले एका मेन्स पार्लर दुकानदाराने नियमाचे उलंघन करून दुकान उघडून काम सुरू ठेवले म्हणून त्याचे विरूद्ध गुन्हा दाखल करून हे दुकान सिल करण्यात आलेसायखेडा फाटा ओझर येथील वाल्मिक मेन्स पार्लर हे दुकान आज सकाळी 7 वाजेपासून उघडले होते या दुकानाचे मालक कोरोना पॉझिटिव्ह असताना त्यांनी दुकान चालू करून ते केशकर्तनाचे म्हणजे दाढी कटींगचे काम करत होते दाढी कटींगसाठी दुकानात लोक (गिऱ्हाईक ) बसलेले होते.ही माहिती समजल्यानंतर सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास ओझर कोविड -19 नोडल अधिकारी तथा मंडळ अधिकारी प्रशांत तांबे यांचे मार्गदर्शना नुसार ओझर नगरपरिषद कर्मचारी , ओझरचे तलाठी उल्हासराव देशमुख, ओझरचे सहाय्यक पोलिस निरिक्षक काद्री व पोलीस कर्मचारी यांनी संयुक्त पणे दुकानावर आले व कारवाई करून हे मेन्स पार्लर दुकान सील केले तसेच दुकानाचे मालक वाल्मिक वारुळे रा.सायखेडा फाटा ओझर यांच्या विरुद्ध कलम 188 प्रमाणे ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शासनाने कोविड १९ महामारीच्या नियंत्रणासाठी बंधने घातली आहेत त्याचे पालन करणे जनतेच्या हिताचे असून कोणीही उल्लंघन करू नये. अन्यथा शासकीय नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल.- उल्हासराव देशमुख, तलाठी, ओझर.ओझर व परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत असून दिवसेंदिवस आरोग्य विभाग, व यंत्रणा नियंत्रणासाठी अहोरात्र झटत आहे मात्र त्याचे गांभिर्य पाळले जात नाही.जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे. नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची वेळ आणू नये.- काद्री, सहाय्यक पोलीस निरिक्षक ओझर ओझर येथील सायखेडा फाटयावरील केशकर्तनाल सिल करतांना तलाठी उल्हासराव देशमुख, पोलिस निरिक्षक काद्री, नगर परिषदेचे कर्मचारी व पोलिस.
ओझरला मेन्सपार्लर दुकान सिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 6:24 PM
ओझरटाऊनशिप : सायखेडा फाटा ओझर येथे असलेले एका मेन्स पार्लर दुकानदाराने नियमाचे उलंघन करून दुकान उघडून काम सुरू ठेवले म्हणून त्याचे विरूद्ध गुन्हा दाखल करून हे दुकान सिल करण्यात आले
ठळक मुद्देनियमाचे उलंघन : पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल