ओझर : येथे असलेल्या कचरा डेपोतील ढीग जाळण्याच्या प्रयोगात हजारो नागरिक त्रस्त झाले आहे. धुराचे लोळ सगळ्या गावात जात असल्याने नागरिकांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.सध्या ओझर येथे सर्वाधिक चर्चेचा मुद्दा उपस्थित होतोय तो म्हणजे कचरा जाळण्यामुळे होणार्या त्रासाचा. येथे जुन्या सायखेडा रोड जवळील अनुसया पार्क ला लागून असलेल्या कचरा डेपोच्या दुर्गंधीने अनेक जण हैराण झाले आहे.त्यामुळे परिसरात आजारपण वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.ओझर येथे बाणगंगा नदी किनारी मारु ती वेस स्मशानभूमी मागे व जुन्या सायखेडा रोडला लागून कचरा डेपो असून गावातील तसेच उपनगरातील सर्व कचरा हा घंटागाडीने तेथे आणून टाकला जातो. परंतु गावचा वाढता विस्तार व दररोज हजारो किलो जमा होत असलेला ओला व सुका कचरा हा सदर ठिकाणी आणून टाकला जात असताना त्याची विल्हेवाट जाळून लावण्यात येत असल्याने तो नागरिकांच्या जीवावर उठत आहे. ओला सुका कचरा एक होत असल्याने जागेची प्रचंड कमतरता होत आहे.कचरा डेपोला लागूनच वसाहत आहे तर नदी पलीकडे शेती व शेलार,शिंदे,कदम वस्ती आहे. या आधीही जेसीबीच्या सहाय्याने डिम्पंग करत असताना त्याची प्रचंड दुर्गंधी नागरिकांना सहन करावी लागली होती.सध्या सायंकाळनंतर दररोज कचरा जाळण्याचे प्रमाण वाढल्याने पसरत असलेल्या धुराचे लोळ दुर्गंधी मुळे नागरिकांचे घराबाहेर पडणे मुश्किल झाल्याने अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.महत्वाची बाब म्हणजे सार्वजनिक सौचालाय सदर ठिकाणी असल्याने कुबट वासाचा सामना लहान मुलांपासून तर वयोवृद्ध लोकांना देखील करावा लागत आहे. मुख्य गावात सकाळ सायंकाळ धुराची कुबट दुर्गंधी येत आहे.यामुळे लहान बालकांपासून तर अबाल वृद्धांपर्यंत अनेकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून अनेकांना दम्याचा त्रास सुरू झाला आहे. यामुळे पाण्यातून देखील संसर्गजन्य आजार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.सदर डिम्पंग ग्राउंड विषयी प्रशासनाने गांभीर्याने विचार करून त्विरत पावले उचलण्याची विनंती आता नागरिक करू लागले आहे जेणेकरून दररोज उद्भवणार्या त्रासापासून सुटका होईल.सदर ठिकाणला लागून वसाहती असून त्यात अनुसया पार्क व त्याच्या जवळील परिसर, सरकारवाडा, ओम गुरु देव चाळ, तानाजी चौक, चांदणी चौक, शिवाजी रोड, मारु ती वेस, सायखेडा फाटा,राजवाडा,राणाप्रताप चौक, कोळीवाडा आदी ठिकाणच्या रिहवाशांना सायंकाळी बाहेर पडणे मुश्किल होऊन बसले आहे.याचे मुख्य कारण म्हणजे दूषित धुराचे पसरणारे लोळ अन त्यात उडणारा ठसका अनेकांना गंभीर आजारांना निमंत्रण देईल हे निश्चित आहे त्यामुळे वेळीच ह्या सर्व गोष्टींचे नियोजन केल्यास भविष्यात अडचण निर्माण होणार नाही. दरम्यान ग्रामपालिकेतील काही मंडळी नाशिक मनपाचा खत प्रकल्प पाहून भेट देऊन आली. परंतु त्या दौर्यास आता कित्येक मिहने लोटले असताना सदर प्रकल्पाचा नारळ कधी फुटणार असा प्रश्न विचारला जात असताना विकासात्मक दृष्टिकोन कधी होणार अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहे.
ओझरच्या कचरा डेपोचा प्रश्न ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 5:29 PM
ओझर : येथे असलेल्या कचरा डेपोतील ढीग जाळण्याच्या प्रयोगात हजारो नागरिक त्रस्त झाले आहे. धुराचे लोळ सगळ्या गावात जात असल्याने नागरिकांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
ठळक मुद्देकुबट धुराने नागरिकांचे आरोग्य धोक्यात