ओझर : येथील निफाड तालुका सराफ असोसिएशनने केंद्र सरकारच्या जाचक अटींच्या विरोधात मूक मोर्चा काढला. सराफ असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ओझर शहरातून काळ्या फिती लावून मोर्चा काढला. हा मोर्चा ओझर नागरी पतसंस्था, तांबटगल्ली, माधवराव पहिलवान चौक, लखपती गल्लीमार्गे ग्रामपालिकेत आला. मंडल अधिकारी प्रशांत तांबे, तलाठी उल्हास देशमुख यांना असोसिएशच्या वतीने निवेदन देण्यात आले. मोर्चात निफाड शहर, ओझर मिग, पिंपळगाव बसवंत, रामाचे पिंपळस, लासलगाव, विंचूर, उगाव, नांदुर्डी, पालखेड, शिरवाडे, रानवड, सायखेडा, चांदोरी, सुकेणे, नैताळे येथील सराफ असोसिएशनचे पदाधिकारी सहभागी झाले होते. (वार्ताहर)
ओझरला सराफ व्यावसायिकांचा बंद
By admin | Published: March 12, 2016 10:53 PM