शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

पावणेसहा लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 12:11 AM

दमदार पावसाने दिलासा : आॅगस्टला होणार शंभर टक्के पेरण्या

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या काही दिवसांच्या दमदार हजेरीनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने खरीप पेरण्यांना वेग आला आहे. खरिपाच्या एकूण ६ लाख ५२ हजार ५०० हेक्टर क्षेत्रापैकी ५ लाख ७३ हजार ७७३ हेक्टर (८७. ९३) क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मका पिकाच्या सर्वाधिक २ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. नांदगाव व देवळा तालुक्यात शंभर टक्के क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.भात पिकाचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र ६६ हजार ७०० हेक्टर असून, त्यापैकी ५९ हजार २९९ हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड झाली आहे. खरीप ज्वारीचे ३ हजार ९०० लागवडीचे क्षेत्र असून, त्यापैकी अवघ्या २६७ हेक्टर क्षेत्रावर ज्वारीच्या पेरण्या झाल्या आहेत. खरीप बाजरीचे १ लाख ६० हजार २०० हेक्टर सरासरी लागवडीखालील क्षेत्र असून, त्यापैकी १ लाख १५ हजार २६३ हेक्टर क्षेत्रावर खरीप बाजरी पिकाची पेरणी आटोपली आहे. नागली पिकाचे क्षेत्र ३५ हजार ३०० हेक्टर असताना प्रत्यक्षात १६ हजार ६७१ हेक्टर क्षेत्रावर नागली रोपांची लागवड झाली आहे. मका पिकाचे १ लाख ७३ हजार हेक्टर सरासरी लागवडीखालील क्षेत्र असताना प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त २ लाख १० हजार ५२४ हेक्टर क्षेत्रावर मका पिकाच्या पेरण्या झाल्या आहेत. तूर पिकाचे १० हजार ४०० हेक्टर लागवडीचे क्षेत्र असताना प्रत्यक्षात ९ हजार १११ हेक्टर क्षेत्रावर तुरीची लागवड झाली आहे. उडीद पिकाचे १४ हजार ७०० हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी १० हजार ३२९ हेक्टर क्षेत्रावर उडीद पिकाच्या पेरण्या झाल्या आहे. मुगाचे १० हजार ३०० हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी ८ हजार २५७ हेक्टर क्षेत्रावर मुगाच्या पेरण्या झाल्या आहेत. सोयाबीनची सरासरीपेक्षा अधिक लागवडभुईमूग पिकाचे ३१ हजार ३०० हेक्टर क्षेत्र असताना प्रत्यक्षात २३ हजार ३३० हेक्टर क्षेत्रावर भुईमूग पिकाच्या पेरण्या झाल्या आहेत. सोयाबीन पिकाचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र ५७ हजार हेक्टर असून, त्यापेक्षा जास्त ५९ हजार ५७७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाच्या पेरण्या झाल्या आहेत.