संजय देवरे।लोकमत न्यूज नेटवर्कदेवळा : जिल्ह्यात पाच वर्षांपूर्वी ज्या ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपंचायतीत करण्यात आले होते त्यात देवळा ग्रामपालिकेचा समावेश होता. कोरोनामुळे नगरपंचायतीच्या आर्थिक बाबींवर परिणाम झालेला असला तरी लॉकडाऊनपूर्वी सुरू असलेली सर्व विकासकामे प्रगतिपथावर आहेत. मात्र, ज्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे ती विकासकामे मात्र अद्याप सुरू झालेली नाहीत. आतापर्यंत सन २०१९-२० मधील घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यामुळे पालिकेला दिलासा मिळाला आहे.कोरोनामुळे देवळा शहरात दर रविवारी भरणारा आठवडे बाजार मार्च महिन्यापासून बंद आहे. सन २०२०-२१ सालासाठी आठवडे बाजाराचा वार्षिक लिलाव घेतलेल्या संबंधित ठेकेदाराचे नुकसान होत असल्यामुळे त्यास भविष्यात सहा महिने मुदतवाढ देण्याची कार्यवाही नगरपंचायत प्रशासन करणार असल्यामुळे संबंधित ठेकेदारालाही दिलासा मिळाला आहे. सध्या कोलती नदीपात्रात नियमित भाजीपाला बाजार भरत असल्यामुळे नागरिकांची सोय झाली आहे. या बाजाराचा ठेका ६ लाख ७१ हजार रुपयांना एका ठेकेदाराला दिलेला आहे.बाजारात कोराना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन केले जात असून, त्यावर नगरपंचायतीचे कर्मचारी देखरेख ठेवून आहेत. शहरात अद्यापपर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडलेला नाही. लॉकडाऊन झाले त्यावेळी शहरात विविध विकासकामे सुरू होती. यात बगीचा, कचरा डेपो शेड, पाच कंदील चौक सुशोभीकरण, खाटकी नाला रस्ता आदी कामे सध्या सुरू आहेत. मजुरांअभावी बाजार तळाचे काम खोळंबले आहे. सप्तशृंगीनगर, विद्यानगर, शिवाजीनगर आदी उपनगरात रस्ते व बंदिस्त गटारे यांची कामे मार्गी लागली आहेत.नगरपंचायतीच्या वसुली विभागाच्या कर्मचाऱ्यांनी २०१९-२० या वर्षाची आतापावेतो घरपट्टी ६१ टक्के व पाणीपट्टी ५१ टक्के वसूल केले आहेत. यामुळे नगरपंचायतीला कोरानाच्या महामारीत चांगला आधार मिळाला आहे. देवळा नगरपंचायतीत ४० कर्मचारी असून, विविध कामांचे ठेके दिलेल्या ठेकेदारांचे ४० कर्मचारी असे एकूण ७२ कर्मचारी सध्या कार्यरत आहेत.देवळा ग्रामपालिकेचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर नूतन नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांनी ‘स्वच्छ व सुंदरदेवळा’ ही संकल्पना राबवत शहरात विविध विकासकामे सुरू केली. आमदार डॉ. राहुल आहेर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी देवळ्याच्या विकासकामांत लक्ष घातल्यामुळे निधीची कमतरता कधी जाणवलीच नाही. करवसुलीत यंदाचार लाखांची वाढवसुली विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत २०१९-२० या वर्षाची घरपट्टी २१ लाख ६६ हजार रुपये व पाणीपट्टी १५ लाख ८५ हजार रुपये अशी एकूण ३७ लाख ५१ हजार रुपये वसूल केले आहेत.सन २०१८-१९ मध्ये घरपट्टी १८ लाख ७६ हजार रुपये व पाणीपट्टी १४ लाख ७४ हजार रुपये अशी एकूण ३३ लाख ५० हजार रुपये वसूल केले होते.म्हणजेच गतवर्षापेक्षा चालू वर्षी चार लाख एक हजार रु पयांनी वसुली अधिक झाली आहे.दंडापोटी १४ हजार रुपये वसूलकोरोना संक्र मणकाळात मास्क न वापरता नियमभंग करणाºया नागरिकांकडून नगरपंचायतीने १३ हजार रुपये तसेच रस्त्यावर थुंकणाºयांकडून एक हजार रुपये असे एकूण १४ हजार रुपये दंडापोटी वसूल केले आहेत. यामुळे देवळा नगरपंचायतीला कोरोनाच्या महामारीत काहीसा आर्थिक आधार मिळाला आहे.
विकासकामांची गती मंदावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 9:54 PM
देवळा : जिल्ह्यात पाच वर्षांपूर्वी ज्या ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपंचायतीत करण्यात आले होते त्यात देवळा ग्रामपालिकेचा समावेश होता. कोरोनामुळे नगरपंचायतीच्या आर्थिक बाबींवर परिणाम झालेला असला तरी लॉकडाऊनपूर्वी सुरू असलेली सर्व विकासकामे प्रगतिपथावर आहेत. मात्र, ज्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे ती विकासकामे मात्र अद्याप सुरू झालेली नाहीत. आतापर्यंत सन २०१९-२० मधील घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यामुळे पालिकेला दिलासा मिळाला आहे.
ठळक मुद्देलॉकडाऊनचा परिणाम : देवळा नगरपंचायतीच्या करवसुलीत काहीशी वाढ