शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

विकासकामांचा वेग मंदावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 9:21 PM

सिन्नर :दीडशे वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या सिन्नर नगर परिषदेच्या करवसुलीत पहिल्यांदाच विपरीत परिणाम झाला असून, लॉकडाऊनचा परिणाम अर्थकारणावर झाला आहे. परिणामी विकासकामांचा वेग काहीसा मंदावल्याचे चित्र गेल्या तीन महिन्यांत दिसून येत आहे.

सिन्नर : (शैलेश कर्पे ) दीडशे वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या सिन्नर नगर परिषदेच्या करवसुलीत पहिल्यांदाच विपरीत परिणाम झाला असून, लॉकडाऊनचा परिणाम अर्थकारणावर झाला आहे. परिणामी विकासकामांचा वेग काहीसा मंदावल्याचे चित्र गेल्या तीन महिन्यांत दिसून येत आहे.कोरोना प्रादुर्भावाचा फटका नगर परिषदेस सोसावा लागत आहे. २०१९-२० साली नगर परिषदेस विविध करापोटी सुमारे पाच कोटी रुपये वसुली अपेक्षित होती. मात्र मार्चअखेरीस केवळ दीड कोटी रुपयांची वसुली झाली आहे. नगर परिषदेच्या विविध विकासकामांना मार्च एण्डला ४ ते ५ कोटी आणखी निधी मिळणे अपेक्षित होते. मात्र लॉकडाऊनमुळे हा निधी मिळू न शकल्याने विकासकामे काहीशी धिम्या गतीने सुरू आहेत.नगर परिषदेस बांधकाम व बाजार टॅक्स व विविध येणारा करही कमी मिळाला आहे. त्यामुळे उत्पन्नाचे नवे स्रोत शोधून आर्थिक गरजा भागव्यावा लागणार आहेत. करसंकलन वाढून विकासकामांचा वेग वाढवावा लागणार आहे.सन २०१९-२० साली मार्चअखेरीस घरपट्टी केवळ २९ टक्के तर पाणीपट्टी १८ टक्के वसूल झाली आहे. नगर परिषदेचे अनेक गाळे असून, त्यांचे गाळेभाडेही थकल्याचे चित्र आहे. पूर्वी मंजूर असलेल्या कामांना विकासनिधी मिळाला असला तरी नवीन कामांना अद्यापी निधी किंवा मंजुरी मिळाली नाही. काही कामे मंजूर आहेत मात्र राज्याच्या अर्थकारणावर कोरोनाचा परिणाम झाल्याचेत्याचा आपोआप परिणाम नगर परिषदेच्या अर्थकारणावर झाल्याचे चित्र आहे.नगर परिषदेने शिवाजीनगर व अन्य काही उपनगरात रस्ते व बंदिस्त गटारींची कामे मार्गी लावल्याचेही दिसून आले. आहे तो निधी नगर परिषदेने विकासकामांना वापरून विकासाचा गाडा पूर्णपणे थांबू दिला नसला तरी काही प्रमाणात विकासकामांचा वेग मंदावल्याचेही दिसून आले.----------------------कर्मचाऱ्यांचे पगार मिळाले;पण थोडासा उशीरनगर परिषदेत ९८ कर्मचारी कार्यरत आहे. गेल्या तीन महिन्यात लॉकडाऊनच्या काळात कर्मचाऱ्यांचे पगार झाले. मात्र त्यास काहीसा उशिरा झाला. उशिराने अनुदान येत असल्याने पगारलाही उशीर झाला. नगर परिषदेत विविध ठेकेदाराचे सुमारे १०० कर्मचारी कार्यरत असून, त्यांचे पगार ठेकेदाराच्या माध्यमातून करण्यात येत आहेत.-----------------------आठवडे बाजार वसुली थांबली४मार्चअखेरपर्यंत आठवडे बाजार वसुलीचा लिलाव देण्यात आला होता. मात्र १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१पर्यंत बाजार वसुलीचा लिलाव होेऊ शकला नाही. बाजार लिलावाचे टेंडर झाले हाते. मात्र ते रद्द करण्यात आले. तीन महिन्यांपासून आठवडे बाजार वसुली बंद असल्याने नगर परिषदेच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला आहे.नगर परिषदेच्या आरोग्यव स्वच्छतेवर खर्च वाढला४नगर परिषदेच्या करवसुलीवर कोरोनामुळे विपरीत परिणाम झाला असताना दुसरीकडे आरोग्य व स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात खर्च वाढला आहे. सफाई कामगार, पाणीपुरवठा, औषध फवारणी व खरेदी यावर जास्त प्रमाणात खर्च होत आहे. दरवर्षी २५ ते ३० लाख रुपयांचा विकासशुल्क निधी जमा होत असते. मात्र यावर्षी त्यावर परिणाम झाला आहे.-----------------------कोरोनाच्या काळात विकासकामांवर फारसा परिणाम झाला नाही. जी कामे मंजूर आहेत व ज्यांना निधी आला आहे ती कामे काहीशा उशिरानेही का होईना पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी घरपट्टी व पाणीपट्टी भरून सहकार्य करावे.-संजय केदार, मुख्याधिकारी,सिन्नर नगर परिषद---------------------------दोन महिने लॉकडाऊन राहिल्याने घरपट्टी, पाणीपट्टी, बांधकाम कर, नवीन लेआऊट कर मिळणे बंद झाले. नगर परिषदेत पैसे उपलब्ध नाही. त्यामुळे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून चौदाव्या वित्त आयोगातून पाणीपुरवठा, आरोग्य व विविध विकासकामांना खर्चासाठी परवानगी मिळण्यासाठी साकडे घातले आहे.- किरण डगळे, नगराध्यक्ष,सिन्नर नगर परिषद

टॅग्स :Nashikनाशिक