आहुर्ली : कोरोना रोगाची गडद छाया सर्वत्र पसरली असतानाच तिचा तीव्र फटका शेती व्यवसायालाही बसला आहे. इगतपुरी- त्र्यंबकेश्वर तालुका भात शेतीसह नागली, वरई आदी खरीप पिकाचे आगार मानले जाते. यंदा मात्र कोरोनामुळे खरिप लागवड खोळंबली आहे. आवणीच्या कामास मजूर मिळत नसल्याचे चित्र दिसून येते आहे. मजुरीचे दरही वाढल्याने शेतकरी कुटुंबत थेट रानात उतरल्याचे दिसून येत आहे.यावर्षीच्या प्रारंभापासून सुरू झालेल्या कोरोना रोगाच्या प्रसाराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कालपर्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या गावखेड्यातही कोरोना पोहोचला आहे. ग्रामीण भागातही बाधित रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने त्याचा परिणाम शेतीच्या कामांवर होत आहे. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर हे दोन्ही तालुके भात, नागली, वरई आदी खरीप पिकासाठी प्रसिद्ध आहेत. सध्या या भागात आवणीच्या कामांनी वेग घेतला आहे. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे मजूर शेतात काम करण्यास नकार देत आहे. याचा परिणाम मजूर उपलब्धतेवर झाला आहे. पूर्वी आजूबाजूच्या गावातून, वाड्या-पाड्यावरून मजूर शेतकामासाठी आणले जात असे. मात्र कोरोनामुळे अनेक गावे स्वंयस्फूर्तीने लॉकडाऊन झाली आहेत. गावाच्या बाहेर जाणे किंवा आंगतुकास गावात प्रवेश देणे यावर काही ठिकाणी कठोर प्रतिबंध लादले गेले आहेत. यामुळे अन्यत्र ये-जा थांबल्याने मजुराच्या उपलब्धतेवर त्याचा तीव्र परिणाम झाला आहे.मजूर मिळत नसल्याने भरण्याची शेती असणाºया शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे. भातासह खरीप पिकांची आवणी कशी उरकावी, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.------------------मजुरीचे दर ही वाढले आहेत. ३०० रु पये प्रतिमाणसी दर, दुपारचे जेवण, दोन वेळा चहा आणि मजूर बाहेरचा असेल तर त्याचे गाडीभाडे किमान ५० रु पये अशी एकूण सरासरी पाचशे रु पयापर्यंत मजुरी द्यावी लागत आहे. दुसरीकडे पीककर्ज वाटप ठप्प आहे. तर युरिया खताची तीव्र टंचाई जाणवत आहे. युरिया खरेदीवर अन्य खत घेण्याची सक्ती दुकानदार करत असल्याच्याही तक्र ारी वाढल्या आहेत.
भात आवणीला मजूर मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 8:29 PM