सवर्तीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद - खेड जिल्हा परिषद गटातील पिंपळगाव मोर, अधरवड, टाकेद, खेड, अडसरे, वासाळीसह जवळपास पंधरा वीस ग्रामपंचायती शिवारातील भातशेती वर करपा, तुडतुडा, पांढरा , तांबडा टाका या रोगाने थैमान घातले असुन या भागातील शेतकरी पूर्णपणे खचला आहे. चालूवर्र्षी कोरोना लॉकडाऊन मुळे शेतकरी हैराण झाला आहे. त्यानंतर जून,जुलै पाऊस पडला नसल्याने अक्षरश: कोरडा दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली त्यानंतर आॅगस्ट मध्ये शेतीपूरक पाऊस झाल्याने सर्व शेतकऱ्यांनी उसनवारी,कजर्बाजारी होऊन भातशेतीची लागवड केली व तशी मशागतही केली त्यानंतर शेती पूरक पाऊस असतांना भात शेती जोरात होती. भात पिकांवर मधेच करपा,तुडतुडा,पांढरा टाका या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक शेतकºयांनी चार पाच एकर लागवड केलेली भातपिके उध्वस्त झाली आहेत.अशा संकटात शेतकरी पुर्णपणे चिंताग्रस्त झाला असून अद्यापही शेतकºयांच्या बांधावर एकही स्थानिक लोकप्रतिनिधी अथवा शासकीय अधिकारी पाहणी करण्यासाठी देखील आला नाही व शेतकºयांना साधी भेट पण दिली नाही. प्रशासनाने नुकसान झालेल्या भातपिकांची तात्काळ पाहणी करावी व करप्या रोगाने उध्वस्त झालेल्या भातपिकांची पंचनामे करून शेतकºयांना दिलासादायक नुकसानभरपाई जाहीर करावी अशी टाकेद -अधरवड-खेड -अडसरे या परिसरातील सर्व शेतकºयांची मागणी आहे. (१०टाकेद)-----------------------------दुबार पेरणीचे संकट असतांना सुद्धा न हारता आतापर्यंत उसनवारी करून पन्नास हजार खर्च केला व पाच एकर भातशेती जोपासली करप्या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी जवळपास आठ हजार रुपयांची औषध फवारणी केली तरी सुद्धा करप्या रोगाने भात शेतीची पूर्णपणे वाताहत झाली.शिवाजी ब-हे,शेतकरी, अधरवडटाकेद गटातील आमदार,जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य यांनी कृषी विभागाचे अधिकारी यांनी अद्यापही शेतक?्याच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या भातपिकांची पाहणी केलेली नाही तरी सर्व लोकप्रतिनिधिंनी किमान शेतकरी जगला पाहिजे या दृष्टिकोनातून शासकीय अधिकारी वर्गासह भात पिकांची पाहणी करून पंचनामे करावे.- ज्ञानेश्वर डमाळे ,सरपंच, अधरवड