नाशिक : पेठरोड येथील आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य शाळेतील विद्यार्थ्यांना भोजन पुरवठा करणाऱ्या सेंट्रल किचन संस्थेकडून मिळणाºया पोळ्यांच्या तक्रारीनंतर विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या पोळ्यांचा दर्जा सुधारण्यात आला असून, सेंट्रल किचनमधूनच विद्यार्थ्यांना पोळ्यांचा पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती आदिवासी विकास विभाग उपायुक्तांनी दिली.दरम्यान, विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाच्या पोळ्यांचा पुरवठा झाल्याचा दुजोरा गृहापालांनी दिला आहे. दरम्यान, असे असले तरी पोळ्यांच्या दर्जाचा प्रश्न झाल्यास शाळेतच पोळ्या बनवून देण्याचा पर्यायदेखील खुला ठेवण्यात आल्याचे समजते. एकलव्य आदिवासी निवासी शाळा व वसतिगृहात राहणाºया विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे भोजन दिले जात असल्याचा आरोप करत गेल्या सोमवारी विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. आदिवासी विकास विभागाची चांगलीच धावपळ झाली होती. सोमवारी रात्री आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त लोकेश सलामे, विद्यार्थी, वसतिगृह प्रशासन यांच्यात चर्चा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी मांडलेल्या अटी भोजन पुरवणाºया संस्थेकडे मांडून वसतिगृहातच हाताने बनविलेल्या पोळ्या बनवून देणे तसेच रोज जेवणात दिल्या जाणाºया भाजीचा दर्जा सुधरविण्याच्या अटीवर मंगळवारी विद्यार्थ्यांशी पुन्हा चर्चा करण्यात आली.निकृष्ट अन्नाच्या दर्जाबाबत यापूर्वीदेखील विद्यार्थ्यांनी लेखी तक्रार केली होती. परंतु पोळ्यांचा दर्जा सुधारत नसल्याने विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. विद्यार्थ्यांच्या भूमिकेनंतर विद्यार्थ्यांनी पोळ्यांचा दर्जा सुधारण्याची मागणी केली. त्यानुसार आता पोळ्यांचा दर्जा सुधारण्यात आल्याची माहिती आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त लोकेश सलामे यांनी दिली. त्यानुसार विद्यार्थ्यांना पोळ्यांचा पुरवठा सेंट्रल किचनमधूनच करण्यात आला. या पोळ्यांविषयी विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केल्याची माहिती गृहपाल चौधरी यांनी दिली.अन्नाचा दर्जा राखण्याची मागणीविद्यार्थ्यांची तक्रार केवळ पोळ्यांविषयी होती. यात आता सुधारणा करण्यात आली असून, पोळ्याच ओलसर राहणार नाहीत यासाठी नव्याने पोळ्यांचे पॅकजिंग केले जात असल्याचे आदिवासी विभागाकडून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना पोळ्या बनवून घेण्याबाबतचे आश्वासनदेखील देण्यात आले होते. त्यानुसार शाळेत पोळ्या बनवून देण्याची मागणी मान्य करण्यात आली होती. परंतु विद्यार्थ्यांनी एकमताने सेंट्रल किचनच्या पोळ्यांच्या दर्जाबरोबरच अन्नाचा दर्जा राखण्याची तीव्र मागणी केली. तूर्तास सेंट्रल किचन हाच पर्याय विद्यार्थ्यांनी स्वीकारला असला तरी भविष्यात यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे. सध्या विद्यार्थ्यांना पोळ्यांच्या नव्या यंत्राच्या माध्यमातून पोळ्या बनवून दिल्या जात असल्याचे आदिवासी विभागाकडून सांगण्यात आले.
सेंट्रल किचनमधूनच पोळ्यांचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 12:24 AM