मजदूर संघाच्या निवडणुकीसाठी भारत प्रतिभूती मुद्रणालयात १२९८ तर चलार्थपत्र मुद्रणालयात १२४४ असे एकूण २५४२ कामगार मतदार आहेत. वैध उमेदवारांची अंतिम यादी २५ मार्च रोजी जाहीर करण्यात येणार आहे. २७ मार्च ते १ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. १० एप्रिलला मतदान व ११ एप्रिलला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या कामगारांना सुध्दा मतदान करण्याचा हक्क असतो.
चौकट===
वर्कस कमिटी त्रैवार्षिक निवडणूक
भारत प्रतिभूती मुद्रणालयातील वर्कर्स कमिटी त्रैवार्षिक निवडणुकीसाठी कामगार प्रतिनिंधीच्या ११ व स्टाफ प्रतिनिधींच्या ३ अशा एकूण १४ जागा आहेत. चलार्थपत्र मुद्रणालयात कामगार प्रतिनिधींच्या १३ आणि स्टाफच्या २ अशा एकूण १५ जागा आहेत. दोन्ही मुद्रणालयातील वर्कर्स कमिटीच्या २९ जागेसाठी १० एप्रिलला मतदान होणार आहे. यापूर्वी दोन्ही मुद्रणालयात वर्कशाप, टेक्निकल, कंट्रोल, सीएसडी-स्टोर अशा चार विभागातून प्रतिनिधी उभे राहत होते. त्याच विभागातील कामगार त्या प्रतिनिधींनी मतदान करत होते. मात्र, गेल्या निवडणुकीपासून भारत प्रतिभूती मुद्रणालयातील सर्व कामगार त्या मुद्रणालयातील उमेदवार प्रतिनिधींना मतदान करतात. तर चलार्थपत्र मुद्रणालयातील कामगार त्यांच्या मुद्रणालयातील प्रतिनिधी उमेदवारांना मतदान करणार आहेत. यापूर्वी विभागवार होणारी मतदान प्रक्रिया बंद करून गेल्या निवडणुकीपासून संपूर्ण मुद्रणालय कामगार त्या कारखानातल वर्कर्स कमिटीच्या उमेदवारांना मतदान करतात. २७ मार्चपर्यंत वर्कर्स कमिटी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.