पाटोदा : येवला तालुक्यातील निळखेडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पद्मावती मच्छिंद्र कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित सरपंच संगीता कदम यांच्या अध्यक्षेतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची खेळीमेळीच्या वातावरणात बैठक होऊन उपसरपंचपदाची निवडणूक पार पडली.यावेळी उपसरपंचपदासाठी पद्मावती कदम यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बाळासाहेब हवळे, तलाठी संदीप काकड व ग्रामसेविका थोरात यांनी मदत केली.मागील महिन्यात ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडली असून त्यात थेट जनतेतून सरपंच म्हणून संगीता कदम यांची निवड झाल्याने उपसरपंच निवडीकडे लक्ष लागून होते. जेष्ठ सदस्य म्हणून सर्व नवनिर्वाचित सदस्यामध्ये एकमत होऊन बिनविरोध निवडीची प्रक्रि या पार पडली. यावेळी सदस्य बाळासाहेब आरोटे, अनिता कदम, भीमाबाई आरोटे, अनिता कदम, आकाश शिंदे, सदाशिव पिंपळे आदी यावेळी उपस्थित होते.याप्रसंगी निवत्ती आरोटे, प्रा. संपत कदम, मारु ती कदम, शिवाजी कदम, शिवाजी आरोटे, राजाराम कदम, भानुदास कदम, नवनाथ आरोटे, सुदाम कदम, निवत्ती कदम, विक्र म कदम, संदीप आरोटे, अरु ण कदम, रामदास कदम, विलास कदम, बाबासाहेब कदम, दत्तू कदम, रवींद्र कदम, मच्छिंद्र कदम आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पद्मावती कदम यांची निवड जाहीर होताच समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.
निळखेडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पद्मावती कदम यांची बिनविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 5:20 PM
पाटोदा : येवला तालुक्यातील निळखेडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पद्मावती मच्छिंद्र कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित सरपंच संगीता कदम यांच्या अध्यक्षेतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची खेळीमेळीच्या वातावरणात बैठक होऊन उपसरपंचपदाची निवडणूक पार पडली. यावेळी उपसरपंचपदासाठी पद्मावती कदम यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बाळासाहेब हवळे, तलाठी संदीप काकड व ग्रामसेविका थोरात यांनी मदत केली.
ठळक मुद्देखेळीमेळीच्या वातावरणात बैठक होऊन उपसरपंचपदाची निवडणूक