: तालुक्यातील जळगाव बुद्रुक शिवारात गंगासागर पाझर तलावात चारा पाण्याच्या शोधात आलेल्या पाडसावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करुन गंभीर जखमी केले; मात्र नागरिकांच्या सतर्कतेने पाडसाला वाचविण्यात यश आले.
जंगलातले पाण्याचे स्त्रोत कमी होत चालल्याने हरणांचा कळप पाण्यासाठी शेतांकडे धाव घेत आहेत. साठे यांच्याकडे शेती मशागत सुरु असताना हरणाच्या कळपावर दबा धरुन बसलेल्या मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. दरम्यान, इतर हरणे पसार झाली; मात्र एक पाडस तेथेच घुटमळत राहिल्याने कुत्र्यांच्या तावडीत सापडले. कुत्र्यांचा आवाज ऐकून भाऊसाहेब साठे, दीपक गायकवाड, प्रभाकर निकुंभ यांनी कुत्र्यांना पळवून लावून जखमी पाडसावर नांदगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात अन्ना पवार, नानासाहेब काकळीज यांनी उपचार करून पाडसास वन विभागाच्या हवाली केले.