शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

संत निवृत्तीनाथांनी विसावा घेतलेल्या स्थळी पादुका मंदीर साकारणार : रामनाथ बोडके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 10:21 PM

त्र्यंबकेश्वर : सातशे वर्षापुर्वी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या पावन भुमीत प्रवेश करण्यापुर्वी तळवाडे शिवारातील तुपादेवी फाटा येथे संत निवृत्तीनाथांनी जेथे विश्रांती घेतली होती. त्या ठिकाणी आजही त्यांच्या पादुका आहेत. त्या ठिकाणी भारतीय वारकरी महासंघाचे तालुका अध्यक्ष शिवाजी कसबे यांनी पादुका मंदीर उभारण्याचा संकल्प संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधी यात्रेच्या पार्श्वभूमीवर केला आहे. यानिमित्ताने संत निवृत्तीनाथ महाराज पादुका न्यासची स्थापना करण्यात आली असुन पादुका मंदीर न्यासचे संस्थापकअध्यक्ष रामनाथ पाटील बोडके यांनी हे पादुका मंदीर साकारणार असुन या ठिकाणचा कायापालट लवकरच होणार असल्याचे सांगितले.

ठळक मुद्देसंत निवृत्तीनाथ महाराज यांनी एक दिवस मुक्काम केला होता म्हणुन या ठिकाणी पादुका उभारल्या आहेत.

त्र्यंबकेश्वर : सातशे वर्षापुर्वी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या पावन भुमीत प्रवेश करण्यापुर्वी तळवाडे शिवारातील तुपादेवी फाटा येथे संत निवृत्तीनाथांनी जेथे विश्रांती घेतली होती. त्या ठिकाणी आजही त्यांच्या पादुका आहेत. त्या ठिकाणी भारतीय वारकरी महासंघाचे तालुका अध्यक्ष शिवाजी कसबे यांनी पादुका मंदीर उभारण्याचा संकल्प संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधी यात्रेच्या पार्श्वभूमीवर केला आहे. यानिमित्ताने संत निवृत्तीनाथ महाराज पादुका न्यासची स्थापना करण्यात आली असुन पादुका मंदीर न्यासचे संस्थापकअध्यक्ष रामनाथ पाटील बोडके यांनी हे पादुका मंदीर साकारणार असुन या ठिकाणचा कायापालट लवकरच होणार असल्याचे सांगितले.संत निवृत्तीनाथ महाराज यांची व कुटुंबियांची ब्रम्हगिरी प्रदक्षिणा करतांना विधिलिखितानुसार ताटातूट झाल्यानंतर निवृत्तीनाथ वगळता अन्य सारे कुटुंब नेवासा येथे स्वगृही परतले. पण निवृत्तीनाथ महाराज मात्र गंगाद्वारच्या गुरु गहिनीनाथांच्या गुहेत गुरु गहिनीनाथांचा अनुग्रह घेउन गुरु गहिनीनाथांची सेवा करत होते. ही सेवा पुर्ण झाल्यानंतर निवृत्तीनाथ पुनश्च आपल्या कुटुंबियांकडे गावी परतले. तेथे गेल्यावर त्यांना कळाले की आपले आईवडील गेले. हे चार भावंडे वडिलांनी केलेल्या कथित पापाचे प्रायश्चित्त त्यांच्या आईवडिलांनी तर घेतलेच पण या चार बाळांना शुध्दीपत्र मिळविण्यासाठी पैठण आदी ठिकाणी गेले, पण शुध्दीपत्र मिळाले नाही. पण या दिव्य भावंडांनी असे काही चमत्कार केले की पुढे त्यांना शुध्दीपत्राचीही गरज भासली नाही. निवृत्तीनाथ महाराज हेच ज्ञानदेवाचे गुरु होत. त्यांनी ज्ञानदेवास श्रीमद‌् भगवतगीता सरळ सोप्या भाषेत ज्ञानेश्वरी म्हणून सांगण्याची आज्ञा केली. पुढे ज्ञानेश्वरांनी गुरुआज्ञेने ज्ञानेश्वरी लिहीली. स्वतः भागवत धर्माची मुहूर्तमेढ रोवली. वारकरी सांप्रदायाची स्थापना केली. नाथ सांप्रदाय वारक-यांना सांगितला. शेवटी त्यांना वाटले आपले अवतार कार्य संपले आहे, असे वाटुन ते त्र्यंबकेश्वर येथे आपल्या गुरूस्थानी पायथ्याशी संजीवन समाधी घेण्यासाठी परत त्र्यंबकेश्वर येथे येत असतांना अतिशय थकवा वाटल्याने त्यांनी एक दिवस त्र्यंबकेश्वरच्या सिमेवर तळवाडे शिवारात मुक्काम केला.दुस-या दिवशी ब्रम्हगिरी गंगाद्वारच्या पायथ्याशी संजीवन समाधी घेउन ते समाधिस्त झाले.त्यांनी आदल्या दिवशी विश्रांती घेतलेली हीच ती जागा होय ! येथे अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या कार्यकाळात संत निवृत्तीनाथ महाराज यांनी एक दिवस मुक्काम केला होता म्हणुन या ठिकाणी पादुका उभारल्या आहेत. त्या आजही आहेत. आता या पादुकांचे संरक्षण उन-पावसापासुन व्हावे म्हणून येथे पादुका मंदीर साकारणार आहे. दरम्यान यापुढे त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तीनाथ यात्रेसाठी येणा-या पायी दिंड्या पहिल्य पासुन काही वेळ विसावतात. आणि यापुढेही येथे विसावतील अशा पध्दतीने येथे सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती रामनाथ बोडके यांनी दिली.दरम्यान शिवाजी कसबे, रामनाथ पाटील बोडके, पुरुषोत्तम लोहगावकर, सागर उजे, स्वप्निल शेलार, भुषण अडसरे, रविंद्र सोनवणे आदींनी भुमिपुजन व पादुका पूजन केले.या कार्यक्रम प्रसंगी विलास जगताप, पिंटु बोडके, माजी उपसरपंच रोहिदास बोडके, उपसरपंच संतोष बोडके, तानाजी कड, वामन बोडके, कोंडाजी आहेर, काशिनाथ बोडके, भाऊसाहेब बोडके, रामदास बोडके, बाळु बोडके आदी उपस्थित होते. (पादूकांचा फोटो मागवून बातमी घ्यावा)

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरTempleमंदिर