जळगाव नेऊर : पहिलवानांचे आणि सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या जळगाव नेऊरला आता नवीन ओळख निर्माण झाली आहे ती पैठणी या महावस्त्राची निर्मिती करणाऱ्या गावाची. सिलिब्रिटी, कवी, लेखक यांच्यासह विविध नामांकित क्षेत्रातील लोक या मानाच्या महावस्त्राची खरेदी येथे येऊन करीत असल्याने जळगाव नेऊरच्या लौकिकात भर पडत असल्याचे दिसून येत आहे.या व्यवसायामुळे स्थानिकतरु णांना रोजगार उपलब्ध झाल्याने शहराकडे जाणारे तरु णांचे लोंढे गावातच स्थिरावले असून, हाताला काम मिळाल्याने अनेकांचे प्रपंचही मार्गाला लागले आहेत. शेती व्यवसाय बेभरवशाचा ठरल्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून शेतीपुरक व्यवसायाबरोबरच आधुनिक महावस्त्र निर्मिती करण्याचा पर्याय येथील युवकांनी जोपासला आहे. जगप्रसिध्द पैठणी म्हटली की येवला नाव लगेचच डोळ्यासमोर येते. परंतु येवल्यात बनणारी पैठणी येवल्यात विकली जाते अन् जगभरही तिला मागणी आहे. परंतु येवल्यात बनणाºया पैठणीचे कारागीर हे येवला व ग्रामीण परिसरातील आहेत. कलेचा उपयोग केवळ कारागीर म्हणून न राहता उत्पादक व्हावे, उत्पादकावरच न थांबता विक्र ेतेही व्हावे आणी केलेल्या कष्टातून अधिकचे दोन पैसे आपल्याच पदरात पडावे या व्यवहारी हेतूने जळगाव नेऊर येथील तरु णांनी स्वत:चेच शोरुम थटत महावस्त्र विक्रीचा व्यवसाय उभा केला आहे. दर्जा, विविध व्हरायटी आणि माफक दरामुळे या दालकांकडे ग्राहकदेखील आकर्षित झाले आहेत.परराज्यातील ग्राहकांची खरेदीला गर्दीयेथील पैठणीला देशांतर्गत व देशाबाहेर मागणी वाढली आहे. महामार्गावर कलासंस्कृती पैठणी, संस्कृती पैठणी, रेशीमबंध पैठणी, सौभाग्य पैठणी, लावण्य पैठणी, कलादालन, पैठणी, थोरात पैठणी या पैठणी दालनात राज्य व परराज्यातील ग्राहक येत असल्याने जळगाव नेऊरची पैठणीचे गाव अशी नवीन ओळख निर्माण होत आहे.नोकरीच्या मागे न लागता कलेचा वापर करून पैठणी व्यवसाय वृद्धिंगत केला आहे. ग्रामीण भागात असे व्यवसाय निर्माण होऊन विकसित झाले तर रोजगार निर्माण होईल.- दत्त वाघ, जळगाव नेऊरस्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना एकेदिवशी चहा घेत असताना सहज डोक्यात विचार आला की, आपण नोकरी का करायची? नोकरीच्या पलीकडे या जगात करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत आणि त्याच विचारातून काहीतरी व्यवसाय करण्याची इच्छा आमच्या मनात जागृत झाली. त्या कल्पनेतून आपण कोणता व्यवसाय करावा हा विचार मनात चालू झाला व त्या दृष्टीने अभ्यास करून आम्ही पैठणी व्यवसायाची निवड केली.- राहुल शेळके, रेशीमबंध पैठणी, जळगाव नेऊर
पैठणीने दिली जळगाव नेऊरला नवी ओळख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 10:44 PM
पहिलवानांचे आणि सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या जळगाव नेऊरला आता नवीन ओळख निर्माण झाली आहे ती पैठणी या महावस्त्राची निर्मिती करणाऱ्या गावाची. सिलिब्रिटी, कवी, लेखक यांच्यासह विविध नामांकित क्षेत्रातील लोक या मानाच्या महावस्त्राची खरेदी येथे येऊन करीत असल्याने जळगाव नेऊरच्या लौकिकात भर पडत असल्याचे दिसून येत आहे.
ठळक मुद्देपर्यटकांना आकर्षण : ग्रामीण भागातही मानाच्या महावस्त्राची निर्मिती