जानोरी : दिंडोरी तालुक्यातील एकूण सहा धरणांपैकी तीन धरण शंभर टक्के भरली असून, तिन्ही धरणांतून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात आहे, तर इतर तीन धरणे भरण्याच्या मार्गावर असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांबरोबर इतर तालुक्यातील शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण दिसत आहे. दिंडोरी तालुक्यात सहा मोठे धरणे असून, यामध्ये पालखेड, पुणेगाव, तिसगाव हे तीन धरणं मुसळधार पावसाने शंभर टक्के भरली असून, या तिन्ही धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. तसेच वाघाड, करंजवण व ओझरखेड धरणाचा साठा समाधानकारक स्थितीत असून, दोन-तीन दिवस अजून पाऊस पडला तर तेदेखील शंभर टक्के भरतील. यामुळे शेतकºयांबरोबरच इतर ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण दिसत आहे.चौकटअसा आहे धरणांचा साठा (टक्क्यांमध्ये):1) पालखेड - १००2) पुणेगाव धरण -१००3) तिसगाव धरण -१००4) करंजवन धरण - ८८.४९5) वाघाड धरण - ९१.४२6) ओझरखेड धरण - ७८.७६कोटपाच ते सहा दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस होत असल्याने तालुक्यातील धरण साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यातच तालुक्यातील तीन धरणं शंभर टक्के भरली आहे तसेच तीन धरण भरण्याच्या मार्गावर असल्याने शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण दिसत आहे. त्यामुळे पुढील पिके चांगल्या प्रकारे होतील, अशी शेतकºयांना आशा आहे.- प्रभाकर विधाते, संचालक, वाघाड प्रकल्प, मोहाडी.