वाडिव-हे : इगतपुरी तालुका नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळाच्या पुढाकारातून बुधवारी (दि. १5) घोटी शहरातून स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांची पालखी काढण्यात आली. या पालखी सोहळ्याच्या पाशभूमीवर संपुर्ण घोटी शहर भगवामय करण्यात येऊन प्रमुख मार्गावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळ, हिन्दू संग्राम सेवा, भवानी माता सेवा केंद्र यांच्यासह साधक बांधवांच्या पुढाकारातून पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रवचनकार सूर्यकांत महाराज माळी यांचे सुश्राव्य प्रवचन झाले. यावेळी पालखी सोहळ्यात ‘गणगण गणात बोते’ चा गजर करण्यात आला. महाराजांचे संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचविण्यात आले. या प्रसंगी संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष शरद काळे, विहिंपचे मोहन भगत, रा.स्व. संघाचे शिवाजी मांडे यांच्यासह भक्त मंडळातील शशिकांत धनु, पांडूरंग मराडे, दीपक महाले, राजू उदावंत, मोहन दुभाषे, तुषार वालझाडे, महिला जिल्हाध्यक्षा अर्चना गवळी, वाघ, श्रीमती वैजयंताबाई, गुलाबबाई कोरडे, रजनीकांत धनु, शोभा तुपे, मीना भोर आदिसह शेकडो साधक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
घोटीत नरेंद्राचार्य महाराजांचा पालखी सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 5:25 PM
पालखी सोहळ्यात ‘गणगण गणात बोते’ चा गजर
ठळक मुद्देपालखी सोहळ्याच्या पाशभूमीवर संपुर्ण घोटी शहर भगवामय करण्यात येऊन प्रमुख मार्गावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.