ममदापूर : येवला तालुक्यातील ममदापूर वनसंवर्धन क्षेत्रात लाल-केशरी व पिवळा पळस बहरला आहे. फुललेला पळस पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.'फ्लेम ऑफ द फॉरेस्ट' असे खुद्द इंग्रजांनी ज्याचे वर्णन केले आहे, असा पळसवृक्ष ममदापूर वनक्षेत्रा मध्ये चोहीकडे केशरी, पिवळ्या रंगाच्या फुलांनी बहरला आहे. पळसाची केसरी फुले येणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्याचबरोबर या वनक्षेत्रात हरीण, काळवीट, लांडगा, तरस, कोल्हा यांच्यासह ईगल, बहिरी ससाणा, कोतवाल, धाविक, वेडाराघू, सुगरण पक्ष्यांची घरटी पाहण्यासाठीही पर्यटकांची उत्सुकता वाढली आहे. पळसाला तळहाताएवढी रुंद पाने असतात. पूर्वी त्या पानापासून पत्रावळी, द्रोण बनविले जात असत. काळ बदलला तरी त्याचे महत्त्व कमी झालेले नाही. एखाद्या कार्यक्रमामध्ये प्रसाद वाटण्यासाठी त्याच्या वापर केला जातो. पूर्वी पळसाच्या फुलापासून रंग तयार करून धुलिवंदनाच्या दिवशी त्याचा वापर होत असे,सुंदर आकाराची आणि मनमोहक रंगाची पळस वृक्षाची फुले दूर अंतराहूनच पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. पळसाची फ़ुले पक्ष्यांना आणि मधमाश्यांना आकर्षित करतात. त्यामुळे या बहरलेल्या पळस वृक्षांच्या सौंदर्यात अधिकच भर पडत जाते.
ममदापूरच्या जंगलात बहरला पळस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 01:11 IST
ममदापूर : येवला तालुक्यातील ममदापूर वनसंवर्धन क्षेत्रात लाल-केशरी व पिवळा पळस बहरला आहे. फुललेला पळस पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.
ममदापूरच्या जंगलात बहरला पळस
ठळक मुद्देपर्यटकांची गर्दी : वनक्षेत्रातील पक्षी-प्राण्यांचेही आकर्षण