शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

पालखी हेलिकॉप्टर की बसमधून?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 11:05 PM

नाशिक : आषाढी एकदशीनिमित्ताने दरवर्षी त्र्यंबकेश्वरमधून निघणारी संत निवृत्तिनाथ पालखी यंदा कशी निघणार याविषयी अद्यापही संभ्रमावस्था असल्याचे दिसून येते. ...

ठळक मुद्देनिर्णय अद्यापही प्रलंबित : एसटी महामंडळ प्रक्रियेपासून अनभिज्ञ

नाशिक : आषाढी एकदशीनिमित्ताने दरवर्षी त्र्यंबकेश्वरमधून निघणारी संत निवृत्तिनाथ पालखी यंदा कशी निघणार याविषयी अद्यापही संभ्रमावस्था असल्याचे दिसून येते. राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून पालखी घेऊन जाण्याची संस्थानची मानसिकता असताना जिल्हा प्रशासनाने मात्र अद्याप परवानगी दिलेली नाही, तर उपमुख्यमंत्र्यांनी सुचविलेला हेलिकॉप्टरचा पर्यायही अंमलात येणे अशक्य असल्याने काहीशी निश्चितता निर्माण झालेली आहे.आषाढी एकादशीच्या यात्रेवर यंदा कोरोनाचे सावट असल्याने यंदा काही ठिकाणाहून पालख्या कशा निघणार या विषयची चर्चा सुरू झाली आहे. यात्रेतील गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून अनेक उपायोजना करण्यात येत आहेत; त्याअनुषंगांना दोन बैठकादेखील मंत्रालयीन पातळीवर पार पडल्या आहेत. पालखी सोहळ्याला वारकऱ्यांची होणारी गर्दी लक्षात घेता पालखी शिवशाही बसमधून काढण्याचा पर्याय समोर आलेला आहे. मात्र बसमधून पालखी घेऊन जाताना भाविक रस्त्यातच बस अडवून पालखी पूजन करू लागले, तर मूळ उद्देशालाच हरताळ बसेल. त्यामुळे बसमधून पालखी घेऊन जाण्याचा निर्णय अंतिम करण्यात आलेला नाही.गर्दीची शक्यता टाळण्यासाठी पालखी हेलिकॉप्टरमधून घेऊन जाण्याबाबतचा पर्यायदेखील उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत समोर आला होता. परंतु विविध ठिकाणांहून निघणाºया पालख्यांसाठी हेलिकॉप्टरचा पर्याय कितपत वस्तुनिष्ठ ठरू शकेल याविषयी संस्थानच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. हेलिकॉप्टरमधून मर्यादित वारकरी पालखीसोबत जातील त्यामुळे काही प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यतादेखील वर्तविण्यात आली आहे. कोणत्याही एका पालखीसाठी एक निर्णय नव्हे तर सर्व पालख्यांसाठी सारखाच निर्णय घ्यावा लागणार आहे. मात्र पालखी बसमधून की हेलिकॉप्टरमधून हे अद्यापही ठरलेले नसल्याचे संस्थान पदाधिकाºयांनी सांगितले.दरम्यान, राज्य परिवहन महामंडळाला या संदर्भात विचारणा केली असता श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थानकडून अद्याप बससंदर्भात कोणतीही विचारणा करण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले. बसची मागणी करताच त्यांना बसची सुविधा पुरविण्याची तयारीदेखील महामंडळाने दाखविली आहे.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रमShivshahiशिवशाही