नाशिक : मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील रेल्वेसेवा संपूर्णपणे ठप्प झाली असून, त्याचा परिणाम नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांवरदेखील झाला आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे मुंबईकडे जाणारे प्रवासी नाशिकरोड आणि इगतपुरी स्थानकात अडकून पडले आहेत. दरम्यान, दुरांतो आणि मंगला एक्स्प्रेस या गाड्या इगतपुरी स्थानकातच थांबविण्यात आल्या आहे, तर पंचवटी एक्स्प्रेसला इगतपुरीहून पुन्हा मनमाडला पाठविण्यात आले.सर्वदूर सुरू असलेल्या पावसामुळे रेल्वे वाहतुकीला प्रचंड फटका बसला असून, अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नाशिकहून मुंबईला जाणारी पंचवटी एक्स्प्रेस गाडी मनमाडून नियोजित वेळेत मुंबईकडे सोडण्यात आली मात्र पावसाचा जोर वाढल्याने इगतपुरीतून गाडीला पुन्हा मनमाडकडे पाठविण्यात आली. इगतपुरीत पोहचलेल्या दुरांतो आणि मंगला एक्स्प्रेस या गाड्यांना पाच तास इगतपुरी स्थानकातच पुढे जाण्यासाठीची वाट पाहवी लागली मात्र या मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे या गाड्यांना इगतपुरीत थांबून ठेवण्यात आले आहे.सायंकाळी ५.३० वाजता दुरोतो एक्स्प्रेस रद्द करºयात येऊन त्यामधील प्रवाशांना बसने पुढे पाठविण्यात आले.नाशिक आणि मनमाडकरांसाठी महत्त्वाची असलेल्या पंचवटी एक्स्प्रेसलाही इगतपुरीतून पुन्हा मनमाडकडे पाठविण्यात आले. विस्कळीत झालेल्या रेल्वे वाहतुकीमुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले असून, असंख्य प्रवासी हे गाड्यांमध्ये आणि रेल्वेस्थानकातच अडकून पडले आहेत. उत्तरेतून आलेल्या रेल्वे या इगतपुरीत थांबून ठेवण्यात आल्याने प्रवाशांना संपूर्ण दिवस गाडीतच काढावा लागला. राज्यराणी, सेवाग्राम तसेच गोदावरी एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कसारा रेल्वेस्थानकात पाणी शिरल्यामुळे या मार्गावरील येणाºया अप आणि डाउन गाड्यांना विलंब झाला होता. याशिवाय सकाळी ६ वाजता इगतपुरीस्थानकात पोहचणारी मंगला एक्स्प्रेस विलंबाने सकाळी साडेआठ वाजता स्थानकात पोहोचली.मात्र पावसाचा जोर कायम असल्याने या दोन्ही गाड्यांना स्थानकातच थांबवून ठेवण्यात आले. यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.नाशिकहून मुंबई एकेरी वाहतूक नाशिक-पुणे महामार्गाावरील मुंडेगावजवळ अनेक ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत असल्यामुळे या मार्गावर एकेवरी वाहतूक सुरू करण्यात आली होती. त्यामुळे वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. नाशिक-मुंबई महामार्गावरील गोंदे औद्योगिक वसाहतीच्या पुढील मार्गावर पाणी साचले तर ठिकठिकाणी रस्त्याला तडे गेल्यामुळे सुरक्षितेच्या कारणास्तव या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. मुंबईकडून येणारी वाहतूक हळूहळू पुढे सरकत होती. या मार्गावर एकेरी वाहतूक करण्यात आल्यामुळे वाहनांच्या रांगा वाढतच होत्या. पुुणे-भुसावळ गाडीचा मार्ग बदललासातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे गेल्या २७ तारखेपासून पुणे-भुसावळ या रेल्वेगाडीचा मार्ग बदलण्यात आला आहे. सदर गाडी ही मनमाडमार्गे पुण्याकडे वळविण्यात आलेली आहे. नाशिक, कल्याणमार्गे जाणारी ही गाडी पावसामुळे मनमाडकडून सोडली जात आहे. त्यामुळे नाशिकरोडच्या प्रवाशांना मनमाड गाठून तेथून पुण्याकडे प्रवास करावा लागत आहे, तर कल्याणमधील प्रवाशांची गैरसोय झाल्याने त्यांनी सदर गाडी पूर्ववत मार्गाने सुरू करण्याची मागणी केलेली आहे. दरम्यान, राज्यराणी, सेवाग्राम गोदावरी एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्याची अधिकृत घोषणा रेल्वे प्रशासनाने केलेली आहे.
पंचवटी एक्स्प्रेस फिरली माघारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 12:58 AM
नाशिक : मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील रेल्वेसेवा संपूर्णपणे ठप्प झाली असून, त्याचा परिणाम नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांवरदेखील झाला आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे मुंबईकडे जाणारे प्रवासी नाशिकरोड आणि इगतपुरी स्थानकात अडकून पडले आहेत. दरम्यान, दुरांतो आणि मंगला एक्स्प्रेस या गाड्या इगतपुरी स्थानकातच थांबविण्यात आल्या आहे, तर पंचवटी एक्स्प्रेसला इगतपुरीहून पुन्हा मनमाडला पाठविण्यात आले.
ठळक मुद्देतीन गाड्या रद्द : दुरांतो एक्स्प्रेस इगतपुरीत अडकली