पंचवटी : परिसरात गेल्या काही दिवसांपासून डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, डासांच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत तक्रार करूनही मनपाच्या संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्याने उकाडा सहन करावा लागत आहे. त्यातच रात्रीच्या वेळी डासांचा प्रादुर्भाव असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. महापालिका प्रशासनाकडून डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना केली जात असल्याचे सांगण्यात येत असले तरी केवळ धूरफवारणी करून कोणताही उपयोग होत नसल्याने डासांपासून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांना बळी पडण्याची भीती पंचवटीतील नागरिकांनी व्यक्त केली आहे.परिसरातील काही ठराविक ठिकाणच्या प्रभागांतच औषध फवारणी करण्यात संबंधित विभागाचे कर्मचारी धन्यता मानत असल्याने मनपा प्रशासनाने डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
पंचवटीत वाढला डासांचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 12:40 AM