पंचवटी : दिंडोरी नाका ते निमाणी बसस्थानकदरम्यान महापालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या पदपथावर विविध हातगाडीधारकांनी अतिक्रमण करून महापालिकेच्या अतिक्रमण विभागापुढे आव्हान उभे केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पदपथावरील हातगाड्या हटविण्याची मागणी करूनही अतिक्रमण विभाग सर्रासपणे डोळेझाक करीत असल्याने पदपथावरील हातगाड्या हटता हटेना असे म्हणण्याची वेळ आली आहे.केवळ दिंडोरी नाक्यावरच अतिक्रमण नाही तर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर असलेल्या गाळेधारकांनी दुकानांसमोर विविध वस्तू ठेवून अतिक्रमण केले आहे. यात चप्पल, बूट विक्रेते, हॉटेलचालक तर वाहनदुरुस्ती करणाºया काहींनी मनपाच्याच पदपथावर कब्जा केल्याचे चित्र दिसून येत आहे.मनपा अतिक्रमण विभागाच्या डोळ्यासमोर अशी परिस्थिती असली तरी कारवाई करण्यास प्रशासन दिरंगाई करत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पंचवटी विभागातील अनेक पदपथांवर हातगाडीविक्रेते व्यावसायिकांनी अतिक्रमण केलेले असल्याने मनपाने हे पदपथ विक्रेत्यांसाठी बांधले की पादचारी वर्गासाठी, असा सवाल केला आहे.
दिंडोरी नाका भागात हातगाड्या रस्त्यावरच पंचवटी : अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 11:39 PM
पंचवटी : दिंडोरी नाका ते निमाणी बसस्थानकदरम्यान महापालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या पदपथावर विविध हातगाडीधारकांनी अतिक्रमण करून महापालिकेच्या अतिक्रमण विभागापुढे आव्हान उभे केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पदपथावरील हातगाड्या हटविण्याची मागणी करूनही अतिक्रमण विभाग सर्रासपणे डोळेझाक करीत असल्याने पदपथावरील हातगाड्या हटता हटेना असे म्हणण्याची वेळ आली आहे.
ठळक मुद्देहातगाडीधारकांनी अतिक्रमण करून महापालिकेच्या अतिक्रमण विभागापुढे आव्हान उभे केले अतिक्रमण विभाग सर्रासपणे डोळेझाक