कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा पंचवटी विभागातील म्हसरूळ भाजीमंडईत भाजीपाला खरेदी-विक्रीप्रसंगी विक्रेते व ग्राहक यांच्यात अंतर राहण्यासाठी मनपा पंचवटी विभागीय अधिकारी विवेक धांडे, सहायक अधीक्षक भूषण देशमुख यांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी पांढरे रंगाचे गोल, चौकोनी पट्टे मारण्यात आले, तर दुपारी आरटीओ कॉर्नरप्रमाणेच पंचवटी विभागातील इतरही भाजीपाला विक्रीच्या ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी पांढरे पट्टे आखणी करत विक्रेत्यांना सूचना देण्यात आल्या. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू केल्याने सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी भाजीपाला दुकाने शासनाच्या आदेशानुसार बंद केली आहेत. केवळ अधिकृत भाजीमंडईच्या जागा निश्चित केलेल्या ठिकाणी विक्रेत्यांना ठरवून दिलेल्या वेळेतच भाजीपाला विक्री करता येणार आहे. याशिवाय भाजीपाला खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांमध्ये सामाजिक अंतर राहावे यासाठी दुकानांसमोर पांढरे पट्टे आखणी करून नियमावली केली आहे. (फोटो १३ भाजी)
भाजीपाला विक्रीसाठी पंचवटीत जागा निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 4:14 AM