पंचवटी : परिसरात अवैध मद्य विक्री करणाऱ्या तसेच जुगार, अड्ड्यांवर पंचवटी पोलिसांनी कारवाई करून दोन महिन्यांत २९ संशयितांना अटक करून दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
शहरात विशेषतः पंचवटीत अवैध दारू विक्री जुगार, मटक्याचे अड्डे सुरू असल्याने संशयितांवर कारवाई करण्यासाठी वॉरंट काढले होते. त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत, अशोक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार यांच्या पथकाने जानेवारी फेब्रुवारी अशा दोन महिन्यात धडक कारवाई मोहीम हाती घेत अवैध व्यवसाय करणाऱ्या व जुगार मटका खेळताना आढळून आलेल्या २५ संशयितांना अटक करून त्यांच्याकडून ९० हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर अवैध दारू विक्री करणाऱ्या चार अड्ड्यांवर छापे टाकून केलेल्या कारवाईत ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.