पंचवटी : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना पैसे काढून देण्याचा बहाणा करून एटीएमचा पासवर्ड बघून नंतर एटीएममधून हजारो रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे येथील माधव बापू अहेर (२७) या युवकाला पंचवटी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या संशयिताकडून दीड तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व ५७ हजार रुपयांची रोकड असा १ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहरासह पंचवटी परिसरात कसबे सुकेणे येथील बैरागी वाड्यात राहणाºया अहेर याने अनेकांना एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. पंचवटीत अशाप्रकारे घटना घडल्याने पोलीस शोध घेत असताना गेल्या आठवड्यात गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महेश इंगोले हे त्यांच्या घरापासून पोलीस ठाण्यात जात असताना सीसीटीव्हीत कैद झालेल्या संशयितांपैकी एकजण चहाच्या टपरीवर उभा असल्याचे लक्षात येताच त्याचा पाठलाग करून पकडले व कर्मचाºयांच्या मदतीने पोलीस ठाण्यात आणले. तेथे कसून चौकशी केली असता त्याने शहरात विविध ठिकाणच्या भागात एटीएम कार्ड बदलून पैसे लंपास केल्याची कबुली दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, विलास बस्ते, बाळनाथ ठाकरे, सुरेश नरवडे, दशरथ निंबाळकर, महेश साळुंखे, मोतीराम चव्हाण, संतोष काकड, सचिन म्हस्दे, संदीप शेळके, सतीश वसावे, भूषण रायते, जितू जाधव, विलास चारोस्कर आदींनी ही कामगिरी केली.
एटीएम कार्ड बदलून पैसे चोरणारा गजाआड पंचवटी पोलीस : सोन्याच्या दागिन्यांसह रोकड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 12:35 AM
पंचवटी : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना पैसे काढून देण्याचा बहाणा करून एटीएमचा पासवर्ड बघून नंतर एटीएममधून हजारो रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे येथील माधव बापू अहेर (२७) या युवकाला पंचवटी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
ठळक मुद्देपैसे काढून देण्याच्या बहाण्याने गंडा घातल्याचे उघडकीससीसीटीव्हीत कैद झालेल्या संशयितांपैकी एक टपरीवर उभा