शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: "चार गोष्टी मनासारख्या होतील, चार विरुद्ध होतील"; फडणवीसांचा इच्छुकांना मेसेज
2
देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याची पत्रिका व्हायरल; बघा, त्यांच्यासोबत कोण-कोण घेणार शपथ?
3
'त्या' संघर्षातही आमदारांनी साथ सोडली नाही, आज इतिहास घडला - देवेंद्र फडणवीस
4
Devendra Fadnavis : नगरसेवक ते मुख्यमंत्री...अशी आहे देवेंद्र फडणवीस यांची झंझावाती राजकीय कारकीर्द!
5
डिफेन्स स्टॉक्सची मोठी झेप; ₹२१७७२ कोटींच्या अधिग्रहण प्रस्तांवाना मंजुरी; कोणते आहेत शेअर्स?
6
"आता मला लवकर लग्न करायचंय; ३ मुलांना जन्म द्यायचाय, जर दोन वर्षांत मुलगा..."
7
रशिया हल्ला करणार? युरोपमध्ये चाललीय तिसऱ्या विश्वयुद्धाची तयारी; जर्मन गुप्तचर संघटनेच्या दाव्याने खळबळ
8
मार्गशीर्षाचा पहिला गुरुवार: ७ राशींवर धनलक्ष्मी कृपा, लॉटरीतून लाभ; अपार यश, भरभराटीचा काळ!
9
"दिल्लीत येण्याआधी खूप विचार करतो कारण..."; गडकरींची राजधानीपासून दूर राहण्याला पसंती
10
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला! भाजपा विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड
11
"मी अशा राज्यातून येते, जिथे हिंदी शिकणं गुन्हा वाटतो"; निर्मला सीतारामन लोकसभेत भडकल्या
12
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठं यश; मनी ट्रेल, फंडिंगचे मिळाले पुरावे
13
महिंद्राच्या नवीन इलेक्ट्रिक कारवर बंदी येणार? इंडिगो एअरलाईन्सने खेचलं कोर्टात; काय आहे प्रकरण?
14
IndiGo चा समावेश सर्वात खराब एअरलाईन्सच्या यादीत; 'ही' आहे सर्वात चांगली विमान कंपनी
15
खेडेगावातील लेकीने रचला इतिहास; एकाच वेळी ३ सरकारी नोकऱ्या, आता IAS होण्याचं स्वप्न
16
मोबाइल सायबर हल्ल्यांमध्ये भारत आघाडीवर; २०० हून अधिक अ‍ॅप्स धोकादायक!
17
Pushpa 2 Review: अल्लू अर्जुन नव्हे तर 'या' कलाकाराने गाजवला 'पुष्पा 2'! सिनेमाचा पहिला रिव्ह्यू समोर
18
राहुल गांधींच्या संभल दौऱ्यावरून काँग्रेस-सपामध्ये मतभेद, रामगोपाल यादव म्हणाले...
19
मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावण्यासाठी अभिनेत्याला मिळाले पैसे, म्हणाला- "पांढरे कपडे घालून यायला सांगितलं आणि..."

हाणामारीच्या घटनांनी पंचवटीला हादरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:21 AM

पंचवटी परिसरात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले असून, पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हनुमानवाडी व हिरावाडी भागात हाणामारीच्या दोन घटना घडल्या. यामध्ये दोन युवक जखमी झाले आहेत. हनुमानवाडी रस्त्यावर विनाकारण मारहाणीची घटना घडली, तर हिरावाडी भागात पूर्ववैमनस्यातून झालेल्या मारहाणीच्या घटनेत तलवारींचा सर्रास वापर करण्यात आल्याने परिसरात दहशत पसरली आहे.

नाशिक : पंचवटी परिसरात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले असून, पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हनुमानवाडी व हिरावाडी भागात हाणामारीच्या दोन घटना घडल्या. यामध्ये दोन युवक जखमी झाले आहेत. हनुमानवाडी रस्त्यावर विनाकारण मारहाणीची घटना घडली, तर हिरावाडी भागात पूर्ववैमनस्यातून झालेल्या मारहाणीच्या घटनेत तलवारींचा सर्रास वापर करण्यात आल्याने परिसरात दहशत पसरली आहे.  याबाबत पंचवटी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हिरावाडी भागातील महाराष्टÑ कॉलनीमध्ये फिर्यादी अविनाश महावीर कौलकर (२०) हा युवक आपल्या मित्रासोबत उभा असताना संशयित किरण शेळके , नागेश शेलार, श्रीजय खाडे व त्यांचे दोन अनोळखी साथीदारांनी पूर्ववैमनस्यातून जिवे ठार मारण्याचा कट रचून दुचाकीवरून येत तलवार व लोखंडी गजाने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी कौलकर याच्या डोक्यावर किरण याने वार केले तर नागेश याने लाकडी दंडुक्याने त्याच्या हातापायांवर मारहाण करण्यास सुरुवात केली तसेच श्रीजय याने लोखंडी गज डोक्यावर मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी सर्व संशयितांविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल के ला आहे. याप्रकरणी अद्याप एकाही संशयिताला पोलिसांनी अटक केलेली नसून पोलीस परिसरात त्यांचा शोध घेत आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक इंगोले करीत आहेत. दुसऱ्या घटनेत हनुमानवाडी लिंकररोडवरील एका लॉन्ससमोर चारचाकी मोटारीचे इंधन संपल्याने फिर्यादी प्रसाद देवीदास शिंदे (२१, रा. शांतीनगर) हा युवक त्याचा मावसभाऊ विनायक शशिक ांत जाधव तवेरा मोटारीतून (एमएच १४, एएम ४०८२) खाली उतरले. दोन दुचाकीवरून (एमएच १५, एफआर ४५२४) आलेल्या एकूण चार अज्ञात इसमांनी कुठलेही कारण नसताना त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. लाकडी दंडुक्याने शिंदे व जाधव यांना जबर मारहाण क रून फ्रॅक्चर केले तसेच मोटारीवर दगडफेक करून नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संशयितांनी दोन दुचाकींचा गुन्ह्यात वापर केला असून, दुसºया दुचाकीचा क्रमांक पोलिसांना उपलब्ध झाला नाही.पंचवटीत गुन्हेगारीचा उद्रेकपंचवटी परिसरातील हनुमानवाडी, तारवालानगर, मखमलाबाद लिंकरोड परिसर, दिंडोरीरोड, हिरावाडी, पंचवटी कारंजा परिसरात मागील काही दिवसांपासून गुंडप्रवृत्तीच्या युवकांचा उपद्रव वाढला आहे. अनेकदा लुटीच्या इराद्याने मारहाणीच्या घटना पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडत असून, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा