येवला : उत्कृष्ट कृती आराखडा तयार करणाऱ्या तसेच दर्जेदार काम करणाºया रोजगार सेवकांना पंचायत समितीच्या वतीने पुरस्कार देवुन गौरविण्यात येणार असल्याचे सभापती प्रविण गायकवाड यांनी जाहिर केले.तालुक्यातील उत्कृष्ट रोजगार सेवकांची बैठक नुकतीच संपन्न झाली. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती प्रविण गायकवाड होते. सन २०२०-२०२१ चा रोजगार हमी योजनेचा गाव आराखडा तयार करण्यासाठी तो परिपूर्ण कसा असावा, शासनाने २ सप्टेंबर २०२० रोजी दिलेल्या निर्णया नुसार कृती आराखडा कशा पद्धतीने बनवावा यासंदर्भात येवला पंचायत समिती सभागृहात सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. रोजगार हमी योजनेंतर्गत येणारी कामे अधिक चांगल्या पद्धतीने होण्यासाठी गाव आराखडा परिपूर्ण असावा. तो बनवतांना गावातील प्रत्येक घटकाचा विचार केला पाहिजे व ग्रामिण भागातल्या प्रत्येक गरजू व्यक्तीला रोजगार कसा मिळेल, तसेच पाणीपुरवठा, जलयुक्त शिवार, शेततळे आदी शेतकरी हिताची जास्त जास्त कामे आराखड्यात समाविष्ट करण्याची सूचना यावेळी सभापती गायकवाड यांनी दिल्या. यावेळी ग्रामपंचायत विस्तार अधिकारी यादव, रोजगार एपीओ सपकाळ तसेच रोजगार सेवक उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचलन प्रविण पाटील यांनी केले.
उत्कृष्ट रोजगार सेवकांना पंचायत समिती गौरवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2020 11:23 PM
येवला : उत्कृष्ट कृती आराखडा तयार करणाऱ्या तसेच दर्जेदार काम करणाºया रोजगार सेवकांना पंचायत समितीच्या वतीने पुरस्कार देवुन गौरविण्यात येणार असल्याचे सभापती प्रविण गायकवाड यांनी जाहिर केले.
ठळक मुद्देतालुक्यातील उत्कृष्ट रोजगार सेवकांची बैठक नुकतीच संपन्न झाली.