लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : फायनान्स कंपनीचे हप्ते भरण्याच्या वादातून हिरावाडीतील कमलनगर येथे इंडिका कार जाळल्याची घटना शुक्रवारी (दि. २७) उघड झाली आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत शैलेश भटमुळे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार यज्ञेश पुराणिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार व संशयित आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक असून, काही दिवसांपूर्वी इंडिका कार क्रमांक (एम.एच. ०४ व्ही.ए. ३६४०) विकत घेतली होती. इंडिकावर फायनान्स कंपनीचे लोन केले असल्याने काही दिवसांपूर्वी हप्ते न भरल्याने कंपनीने कार जप्त केली होती. त्या कारणावरून दोघा नातेवाइकांत वाद निर्माण झाला होता. या वादातूनच शुक्रवारी पहाटेच्या सुमाराला संशयित आरोपी पुराणिक याने इंडिका कार जाळल्याची घटना घडली आहे, असे पंचवटी पोलिसांनी सांगितले.
पंचवटीत आर्थिक वादातून कार जाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 5:20 PM