पांडाणे : वणी-पांडाणे-सापुतारा रस्त्याचे चौपदरी करण्याचे काम सुरू असून, पुणेगाव फाटा ते देव नदीपर्यंत सुरू असलेल्या कामामुळे पांडाणे परिसरातील वाहनधारकांची गैरसोय होत आहे. या कामामुळे उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सर्दी-खोकला, घसादुखी यासारख्या आजारास निमंत्रण देत असून, साथीच्या रु ग्णात वाढ झाली आहे. रस्त्याचे रखडलेले काम तत्काळ मार्गी लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.वणी-सापुतारा हा राज्यमार्ग होता. परंतु काही महिन्यांपासून या मार्गाचे राष्ट्रीय मार्गात हस्तांतरण झाल्यामुळे रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. नाशिककडून सापुतारामार्गे सुरतला जाणाºया वाहनांचा मार्ग पांडाणे, बोरगाव मार्गे आहे. या रस्त्याचे चौपदरीकरण सुरू आहे. सध्या पांडाणे गावाजवळ काम सुरू आहे.जेसीबीच्या साहाय्याने रस्त्याचे खोदकाम केल्याने धूळ उडत आहे.या धुळीमुळे ग्रामस्थांना सर्दी, खोकला, श्वननाच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. धुळीपासून बचाव करण्यासाठी ग्रामस्थांनी आपल्या घरांवर शेडनेट लावून धुळीमुळे होणाºया आजारांपासून सुटका करण्याचा प्रयत्न केला आहे. रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पांडाणे-सापुतारा रस्त्याचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 6:41 PM