लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पंढपूर येथे दरवर्षी वारीच्या निमित्ताने येणाºया लाखो वारकरी भाविकरांची सेवा करणाºया निर्मळ वारी अभियानातून प्रेरणा घेऊन यंदा वनवासी कल्याण आश्रमाने ‘त्र्यंबकेश्वर निर्मळ वारी अभियान-२०१८’ उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत १० ते १२ जानेवारी या कालावधीत होणाºया त्र्यंबकेश्वर येथे होणाºया संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यात्रेसाठी येणाºया लाखो भाविकांची सेवा आणि स्वच्छता राखण्याचा निर्धार वनवासी कल्याण आश्रमाने केला असून, त्यासाठी आश्रमाद्वारे निर्मळ वारी अभियानातून प्रबोधन व स्वच्छता मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती आश्रमातर्फे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आली.त्र्यंबके श्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या यात्रेसाठी राज्यभराच्या कानाकोपºयातून भाविक दर्शनासाठी येत असतात. या यात्रेसाठी येणाºया भाविकांच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वर यात्रा परिसरात होणारा मैला आणि कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासकीय स्तरावरून प्रयत्न केले जात असले तरी या प्रयत्नांना जनतेची साथ मिळणे गरजेचे आहे. ही साथ मिळवून देण्यासाठी आदिवासी कल्याण आश्रमातर्फे पुढाकार घेण्यात आला असून, आश्रम त्र्यंबकेश्वर यात्रेच्या माध्यमातून निर्मळ वारी अभियान हाती घेतले आहे. त्यासाठी पंढरपूर यात्रेत नाशिक आणि त्र्यंबके श्वरमधील ४० स्वयंसेवकांनी यवत येथील निर्मळवारी अभियानाच्या प्रकल्पास भेट देऊन यापासून प्रेरणा घेत त्र्यंबकेश्वरमध्ये असाच प्र्रकल्प उभारण्याचा संकल्प सोडला आहे. त्यासाठी त्र्यंबकेश्वरमील १३हून अधिक ठिकाणी सर्वेक्षण करून नागरिक व प्रशासनाशी समन्वय साधत यासाठी रचना करण्यात आली असून, यात सुमारे २८०० स्वयंसेवकांची योगदान अपेक्षित असल्याची माहिती वनवासी कल्याण आश्रमातर्फे देण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी यात्रा परिसराच्या भौगोलिक पाहणीसह स्वच्छतागृहांची संभाव्य रचना, तात्पुरते स्वरूप, पाण्याची व्यवस्था, मैल्याचे व्यवस्थापनस शौचालये वापरण्यासाठी जनप्रबोधन, लाइटची व्यवस्था आदी मुद्देल लक्षात घेऊन निर्मळ वारीत तात्पुरच्या शौचालयांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
पंढरपूरच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वरमध्ये निर्मळवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 6:54 PM