शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पंढरीच्या वारीत भेटतो परमपुरुषार्थ प्राप्तीचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:43 AM

आषाढाची चाहूल लागली की वारकऱ्याची अवस्था ‘संपदा सोहळा नावडे मनाला। लागला टकळा पंढरीचा॥’ अशी होते. थोतांड, कर्मकांड आणि भाकड गोष्टींपासून दूर राहण्याची शिकवण जोपासणारा वारकरी ‘पंढरीची वारी आहे माझे घरी।आणिक न करी तिर्थव्रत॥’ असे सात्विक अभिमानाने सांगत वारीला निघतो.

आषाढाची चाहूल लागली की वारकऱ्याची अवस्था ‘संपदा सोहळा नावडे मनाला। लागला टकळा पंढरीचा॥’ अशी होते. थोतांड, कर्मकांड आणि भाकड गोष्टींपासून दूर राहण्याची शिकवण जोपासणारा वारकरी ‘पंढरीची वारी आहे माझे घरी।आणिक न करी तिर्थव्रत॥’ असे सात्विक अभिमानाने सांगत वारीला निघतो. नाशिक जिल्हा तर अशा खानदानी वारकºयांचे आगारच म्हणावे लागेल. पिढ्यानपिढ्या ‘पंढरीचा वारकरी। वारी चुको नेदी हरी॥’असं म्हणत नाशिककर वारकरी वारी करीत आहे. यामुळेच अध्यात्माची राजधानी असा लौकक असणाºया नाशिकचा वारीतही झेंडा पुढेच असतो.‘सकळांशी येथे आहे अधिकार । कलियुगी उध्दार हरिच्या नामे॥’ अशी साधी,सोपी आणि सरळ भक्तीची शिकवण देणाºया वारकºयांना वारी म्हणजे आयुष्याचे सार्थक करणारा सोहळा आणि साधना. एºहवी वारकरी लौकीक गोष्टीला कधीही महत्व देत नाही. ‘तुका म्हणे नको वरपंग देवा।घ्यावी माझी सेवा भाव शुध्द॥’ असा दंडक असणाºया वारकºयाला अंतकरणपूर्वक विठ्ठलाची भक्त करणेच आवडते. ‘आषाढी कार्तिक पंढरीची वारी। साधन निर्धारी आण नाही॥’ असा वारकºयाचा ठाम निर्धार आहे. पंढरपूरची वारी म्हणजे वारकºयाचं सर्वस्वच. वारी म्हणजे साधना.वारकरी वारीला मोक्षाचा मार्ग समजतात. ‘पंढरीचे वारकरी। ते अधिकारी मोक्षाचे॥’असा सुप्रसिध्द आणि प्रमाण मानला जाणारा अभंग आहे. याचाच अर्थ वारी म्हणजेच मोक्ष.मानवी जीवनात परमपुरुषार्थ प्राप्त करावा अशी सर्वांचीच इच्छा असते.तो वारकºयाला वारीत दिसतो,भेटतो आणि याची देही याची डोळा अनुभवण्यास मिळतो. पंढरपूरच्या वारीतला आनंद तर संतांच्या भाषेत ‘हा सुखसोहळा स्वर्गी नाही’ अशाच स्वरुपाचा असतो. कोणाला निमंत्रण नाही, कोणाला आग्रह नाही, कोणाचा बडेजाव नाही. तरीही वर्षानुवर्षे हा सोहळा वर्धिष्णू स्वरुपात सुरुच आहे. ‘गात जागा,गात जागा।प्रेम मागा विठ्ठला॥’ अशी भजनावली म्हणत वारकरी पंढरीच्या दिशेने निघतात. वारकºयांच्या भजनात सात्विकता तर असतेच शिवाय प्रबोधनही असते. वारकºयांची वाद्य, भजनाच्या चाली, पावल्या या सर्व सुसंस्कृतपणे कलाविष्कार करणाºया असतात.ताल आणि तोल या दोन्हीतही वारकरी पक्का असतो. निष्काम भक्तीचे प्रतिक म्हणजे वारकरी. तो कुणाकडेही काहीही मागत नाही. जे मागतो ते हेच ‘हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा॥’ हीच वारक-याची खरी ओळख. -अ‍ॅड. भाऊसाहेब गंभीरे(लेखक कीर्तनकार व संत साहित्याचे अभ्यासक )

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी