शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

पॅनल निर्मितीच्या हालचाली

By admin | Published: October 17, 2016 1:10 AM

भाजपात सामसूम : सटाण्यात कॉँग्रेसचा उमेदवार जाहीर

 सटाणा : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढविण्याबाबत राष्ट्रीय कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीचा अद्याप निर्णय झाला नसताना कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी सटाणा पालिकेच्या थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय पंडितराव पाटील यांचे नाव जाहीर केल्याने अनेक राजकारण्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, पाटील यांची उमेदवारी जाहीर करून कॉँँग्रेसने आघाडी घेतली असून, पॅनल निर्मितीसाठी हालचालींना वेग आला आहे.नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सटाणा शहरात नुकतीच कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी व इच्छुकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत ठेंगोडा, पठावे दिगर, नामपूर गट वगळता इच्छुकांचा अभाव दिसून आला. ठेंगोडा गटात जिल्हापरिषदेच्या माजी सभापती संगीता पाटील, प्रा. अनिल पाटील यांच्या सौभाग्यवती सारिका, गणात पंचायत समिती सदस्य परशुराम अहिरे यांच्या सौभाग्यवती, मुंजवाड गणातून संजय गरुड, पठावे दिगर गटातून सुरेश वाघ, राजाराम गांगुर्डे, सचिन कोठावदे, नामपूर गटातून सोमनाथ सोनवणे यांनी दावेदारी केली, तर नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी जिल्हाध्यक्ष पानगव्हाणे यांनी थेट विजय पाटील यांचे नाव जाहीर करून उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, संपर्क प्रमुख राधाकृष्ण विखेपाटील, उत्तर महाराष्ट्रचे प्रभारी आमदार भाई जगताप ,पक्षनिरीक्षक डी.जी.पाटील यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी बैठकीत स्पष्ट केले. बैठकीत जिल्हाध्यक्ष पानगव्हाणे यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा नारा दिला असला तरी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या वरिष्ठ पातळीवर निवडणुका एकत्रित लढण्याची चर्चा आहे. मात्र अद्याप निर्णय झाला नसताना पानगव्हाणे यांनी पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विजय पाटील यांचे धाकटे बंधू व जिल्हापरिषदेचे माजी सभापती यशवंत पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी तालुकाध्यक्ष साखरचंद कांकरिया, शहराध्यक्ष किशोर कदम, जिल्हापरिषद सदस्य प्रा. अनिल पाटील, प्रल्हाद पाटील, अण्णा काशीराम सोनवणे, यशवंत अहिरे, सोमनाथ सूर्यवंशी, पांडुरंग भामरे, सचिन कोठावदे परशुराम अहिरे, सिराज मुल्ला आदि उपस्थित होते. (वार्ताहर)