नाशिक - महापालिकेने बोहोरपट्टीत सरकारवाड्यालगत बसणा-या फेरीवाल्यांना पर्यायी जागा देऊनही फेरीवाले हटायला तयार नाहीत. गुरुवारी मनपाच्या पथकाला बोहोरपट्टीत ‘ना फेरीवाला क्षेत्र’चा फलक लावण्यास विक्रेत्यांनी विरोध केला. त्यामुळे, पथकाने पोलिस बंदोबस्तात सदर फलक रोवला असून शुक्रवार (दि.१९) पासून रस्त्यांवर बसणाºया फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली जाणार असल्याची माहिती पश्चिमचे विभागीय अधिकारी नितीन नेर यांनी दिली आहे.फेरीवाला धोरणांतर्गत महापालिकेने बोहोरपट्टीतील सरकारवाड्यालगत रस्त्यावर व्यवसाय करणा-या १७ विक्रेत्यांना नारोशंकराच्या मंदिराच्या समोरील भागात पर्यायी जागा दिलेली आहे. फेरीवाला समिती सदस्यांच्या उपस्थितीत रितसर सोडतही काढण्यात आली. त्यानुसार, महापालिकेने जागेवर आखणी केली परंतु, विक्रेत्यांकडून आता वेगवेगळी कारणे दाखवत स्थलांतरास नकार दिला जात आहे. महापालिकेच्या पथकाने यापूर्वी दोनदा फेरीवाल्यांना हटविण्याची कार्यवाही देखील केली. गुरुवारी (दि.१८) पश्चिमचे विभागीय अधिकारी नितीन नेर आणि त्यांचे पथक बोहोरपट्टीत ‘नो हॉकर्स झोन’चा फलक लावण्यासाठी गेले असता, विक्रेत्यांनी फलक उभारण्यासही विरोध दर्शविला. अखेर विभागीय अधिका-यांनी सरकारवाडा पोलिसांना पाचारण केले आत्रण पोलीस बंदोबस्तात फलक रोवला. शुक्रवार (दि.१९) पासून बोहोरपट्टीत रोज अतिक्रमण विभागाचे वाहन तैनात केले जाणार असून संबंधित विक्रेत्यांना हटविण्याची कारवाई केली जाणार आहे. विक्रेत्यांनी त्यांना नेमून दिलेल्या जागेतच बसावे आणि रस्त्यावरील अडथळे दूर करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.अन्यथा गुन्हे दाखल करणारबोहोरपट्टीतील फेरीवाल्यांनी अगोदर स्थलांतरणास संमती दर्शविली. त्यांनी पर्यायी जागेलाही पसंती दिली. परंतु, आता स्थलांतरणास टाळाटाळ केली जात आहे. मात्र, बोहोरपट्टीत ‘नो हॉकर्स झोन’मध्ये फेरीवाल्यांना व्यवसाय करता येणार नाही. बेकायदेशिरपणे फेरीवाल्यांनी व्यवसाय थाटल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत.- नितीन नेर, विभागीय अधिकारी, पश्चिम विभाग
नाशकात बोहोरपट्टीत पोलीस बंदोबस्तात रोवला ‘नो हॉकर्स झोन’चा फलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 4:05 PM
विक्रेत्यांनी केला विरोध : उद्यापासून फेरीवालाविरोधी कारवाई
ठळक मुद्देबोहोरपट्टीत सरकारवाड्यालगत बसणा-या फेरीवाल्यांना पर्यायी जागा देऊनही फेरीवाले हटायला तयार नाहीत सरकारवाड्यालगत रस्त्यावर व्यवसाय करणा-या १७ विक्रेत्यांना नारोशंकराच्या मंदिराच्या समोरील भागात पर्यायी जागा