ठक्करनगरमधील निशांत व पूजा अपार्टमेंटसमोरील रस्ता सफाई कर्मचाऱ्यांकडून नेहमीप्रमाणे झाडू मारून स्वच्छ केला जात होता. यावेळी त्यांना एका खोक्यामध्ये प्लॅस्टिकच्या चेंडूसारख्या गोल आकाराची वस्तू दिसून आली. सफाई कर्मचारी राेहित व राजेंद्र यांनी तत्काळ प्रसंगावधान राखत पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली. माहिती मिळताच नियंत्रण कक्षामधून सरकारवाडा पोलीस ठाणे, बॉम्बशोधक-नाशक पथकाला बिनतारी संदेश यंत्रणेवरून माहिती दिली गेली. माहिती मिळताच बीडीडीएसचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे हे सर्व अत्याधुनिक साधनसामुग्रीसह जवानांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले, तसेच उपायुक्त अमोल तांबे, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रियाज शेख हेही कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. तांबे यांच्या आदेशावरून शरणपूर रोडकडून ठक्करनगरचा कॉलनी रस्ता तत्काळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. हा संपूर्ण परिसर निर्मनुष्य करत प्रतिबंधित केला गेला.
--इन्फो--
‘लकी’चा इशारा अन्...
‘लकी’ श्वानाच्या साहाय्याने त्या संशयित खोक्याची तपासणी पथकाकडून करण्यात असता, श्वानाने पथकाला धोक्याचा इशारा दाखविला. तत्काळ पथक ॲलर्ट झाले आणि बॉम्बनाशक यंत्रणेच्या सहाय्याने पुढील कारवाई सुरू करण्यात आली. रहिवाशांना घाबरून न जाण्याचे आवाहन करत कुठल्याही प्रकारचा बॉम्ब नसल्याचे सांगण्यात आले. दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही मोहीम फत्ते करण्यात आली.
--इन्फो--
फायबरच्या चेंडूत आढळली फटाक्याची दारू
पोलीस कर्मचारी साहेबराव नवले यांनी विशेष सूट परिधान करत, त्या खोक्याजवळ जाऊन पडताळणी करून घेत, प्रशिक्षण व कौशल्याच्या जोरावर प्लास्टीकचा चेंडू सुरक्षितरीत्या फोडला. यावेळी यामधून फटाक्यामध्ये असणारी दारू आणि चेंडूला लावलेली वात अशा स्वरूपात स्फोटक असल्याची खात्री पटली. तत्काळ पोलिसांनी हे स्फोटक साहित्य जप्त केले. फटाक्यामध्ये असणारी दारू अर्थात, गन पावडर आणि ॲल्युमिनियम पावडरला फायबरचे चेंडूचे आवरण असल्याचे कोटिंग केले गेले होते, असे बीडीडीएसच्या पथकाने निष्पन्न केले.
---कोट---
एका फायबरच्या चेंडूसारख्या वस्तूमध्ये मोठा फटाक्याच्या स्वरूपात स्फोटकसदृश्य वस्तू कोणीतरी अज्ञात समाजकंटकाने या ठिकाणी ठेवून पळ काढला. त्याचा पोलीस शोध घेत आहेत. ही स्फोटकसदृश्य वस्तू खूप काही तीव्रता असणारी नव्हती. यामध्ये आढळून आलेली दारूही फटाक्याच्या दारूप्रमाणे असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. त्यामुळे याला बॉम्ब म्हणता येणार नाही. कुठल्याही प्रकारचे धातूचे घटक या वस्तूमधून मिळून आलेले नाही. नागरिकांनी अफवा पसरवू नये. संपूर्ण परिसर सुरक्षित आहे.
- अमोल तांबे, पोलीस उपायुक्त
===Photopath===
020321\02nsk_24_02032021_13.jpg~020321\02nsk_25_02032021_13.jpg~020321\02nsk_26_02032021_13.jpg
===Caption===
फटाक्याची दारु भरलेला चेंडू ~फटाक्याची दारु भरलेला चेंडू ~फटाक्याची दारु भरलेला चेंडू