नाशिक : ‘पानिपत’च्या इतिहासाकडे नेहमीच दुर्लक्ष केले गेले. यामुळे या इतिहासाच्या वाट्याला उपेक्षा आली. पानिपतच्या युध्दात मराठ्यांचा पराभव जरी झाला असला तरीदेखील त्यांचे शौर्य आणि देदिप्यमान पराक्रमाची साक्ष म्हणून ‘पानिपत’ला विसरता येणे शक्य नाही, असे प्रतिपादन डॉ. उदय कुलकर्णी यांनी केले.ज्योती स्टोअर्स व शंकराचार्य न्यासाच्या सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘लेखक तुमच्या भेटीला’ या कार्यक्रमात कुलकर्णी ‘पानिपत: १४ जाने.१७६१’ याविषयावर बोलत होते. यावेळी ते म्हणाले, पानिपतच्या लढाईत मराठ्यांना पराभव झाला असला, तरी त्यातील विविध बाजू पुढे येत आहते. पानिपतमध्ये असताना मराठ्यांना पाठवली गेलेली पत्रे नष्ट झाली. त्यामुळे एकतर्फी इतिहासाची मांडणी झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सन १७६१नंतर पानिपत वर कोणीही बोलण्याचा पुढाकार घेतला नाही. परिणामी बेताच्या परिस्थितीत मराठ्यांनी गाजवलेला पराक्रम आणि शौर्य प्रकाशझोतात येऊ शकले नाही. यावेळी कुलकर्णी यांनी सन १७०७ पासून उभी राहिलेली पानिपतच्या लढाईची पार्श्वभूमी लघुफितीद्वारे उपस्थितांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला.औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगलांची सत्ता क्षीण होत गेली व मराठ्यांनी मोठा साम्राज्याचा विस्तार झाल्याचेही ते म्हणाले. अहमदशहा अब्दालीला पैशांची गरज भासू लागली. त्यामुळे त्याने पंजाब, हरियाणामार्गे दिल्लीत धडक दिली. त्याच्या सैन्याशी सदाशिवराव भाऊ पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी कडवी झुंज दिली.
मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष ‘पानिपत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 10:59 PM
पानिपतच्या लढाईत मराठ्यांना पराभव झाला असला, तरी त्यातील विविध बाजू पुढे येत आहते. पानिपतमध्ये असताना मराठ्यांना पाठवली गेलेली पत्रे नष्ट झाली.
ठळक मुद्देपानिपतमध्ये असताना मराठ्यांना पाठवली गेलेली पत्रे नष्ट झाली. एकतर्फी इतिहासाची मांडणी झाल्याची खंत