शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: 'कशाला कोर्टात गेली?'; अजित पवार सुळेंवर भडकले; शरद पवारांनाही केला सवाल
2
देवेंद्र फडणवीसांविरोधात काँग्रेस वापरतेय कर्नाटकचा ब्रेन? सांगितली मविआची स्ट्रॅटेजी
3
मोठी बातमी: तपासणीदरम्यान पोलिसांच्या हाती मोठे घबाड; कारमध्ये सापडले २ कोटी रुपये!
4
हत्या झालेल्या पतीला मिळवून दिला न्याय, महिलेने आई-वडील आणि भावाला घडवली जन्मठेप
5
KKR चा 'भारी' डाव! श्रेयस अय्यरला रिटेन करणार नाही; फ्रँचायझीला होणार मोठा फायदा
6
"मनसुख हिरेनची हत्या होणार हे अनिल देशमुखांना आधीच माहिती होतं की नव्हतं?"
7
अजित दादांनी नवाब मलिकांना उमेदवारी दिल्याने फडणवीस नाराज, म्हणाले, 100 टक्के...
8
Explainer : एक विधान बारामतीच्या निवडणुकीचा रंग बदलणार? अजितदादा बोलून गेले, पवारांनी अचूक हेरले; आता...
9
एक बातमी आणि 'या' डिफेन्स कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; पोहोचला ₹१००० पार 
10
पूजा खेडकरचे वडील निवडणुकीला उभे राहिले; लोकसभेला मनोरमा पत्नी होती, विधानसभेला 'नाही' दाखविले
11
NOT FOR LONG... हिज्बुल्लाने नवा 'चीफ' जाहीर केला, इस्रायलने 'गेम' प्लॅन सांगून टाकला!
12
मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडली; उपचार सुरू, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती
13
जास्त सामान नेणाऱ्या प्रवाशांवर कारवाई, एक्स्प्रेससाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय
14
Maharashtra Election 2024: शिवसेना उमेदवार सुहास कांदेविरोधात गुन्हा दाखल
15
Maruti Suzuki Company Share : तब्बल १७ वर्षांनंतर मारुती सुझुकीची 'ही' कंपनी देणार बोनस शेअर्स, स्टॉकमध्ये मोठी तेजी
16
IPL 2025 : वॉशिंग्टन सुंदरचा 'भाव' लय वाढला; ताफ्यात घेण्यासाठी मुंबईसह तीन संघ उत्सुक
17
केळकरांच्या उमेदवारी अर्जावर विचारेंचा आक्षेप; ठाणे शहर मतदारसंघात ट्विस्ट येणार?
18
पंखा पाहिल्यावर भीती वाटते का?; अर्जुन कपूरही 'या' आजाराने त्रस्त, 'ही' आहेत लक्षणं
19
काँग्रेसने बंडखोर उमेदवारांबाबत घेतला मोठा निर्णय, रमेश चेन्निथला यांनी केली महत्त्वाची घोषणा
20
क्विक कॉमर्स कंपनी Blinkit वरून सोन्याचं नाणं खरेदी करणं पडलं महागात, झाला स्कॅम; प्रकरण काय?

पानसरे हत्त्या प्रकरण : मोबाइलवरील आवाजाचे नमुने गुजरातला पाठविले

By admin | Published: September 17, 2015 11:50 PM

तिघे ताब्यात

कोल्हापूर : कामगार चळवळीचे नेते आणि पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्त्येप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी संशयित समीर गायकवाड याच्या ‘ज्योती’ नावाच्या मुंबईतील प्रेयसी आणि संकेश्वर येथील दोन नातेवाइकांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यांच्या मोबाइल संभाषणाच्या आवाजाचे नमुने गुजरातला पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले. पानसरे हत्त्याप्रकरणी सनातन संस्थेचा पूर्णवेळ कार्यकर्ता समीर गायकवाड (३२) याला बुधवारी पहाटे कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून दोन मोबाइल जप्त करण्यात आले होते. त्यावरून ज्यांच्याशी त्याचे संभाषण झाले, त्यामध्ये एका तरुणीसह दोघा तरुणांचा समावेश होता. पोलिसांनी त्यांच्याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने ते मुंबई, पणजी, संकेश्वर येथे राहत असल्याचे सांगितले.सर्वांत जास्त मोबाइल कॉल्स ज्या तरुणीला झाले होते. तिच्याशी तुझे काय संबंध आहेत, अशी विचारणा केली असता ती आपली प्रेयसी असल्याची कबुली त्याने दिल्याचे समजते. त्यानुसार बुधवारी रात्री उशिरा त्याच्या मुंबईतील प्रेयसीसह जवळच्या दोन नातेवाइकांना ताब्यात घेण्यात आले. गुरुवारी दिवसभर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. संशयित गायकवाड याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये बसवून ठेवले होते. त्याच्याकडूनही पोलिसांचे विशेष पथक माहिती घेत होते; परंतु तो सुरुवातीपासून तपासाला सहकार्य करीत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याच्यासह प्रेयसी व गायकवाडच्या दोन नातेवाइकांच्या आवाजाचे नमुने चाचणीसाठी गुजरातला पाठविण्यात आले.-------------------------- पुण्याच्या ‘सायबर सेल’चे पथक कोल्हापुरातपुणे येथील ‘सायबर सेल’चे पथक गुरुवारी सकाळी कोल्हापुरात दाखल झाले. संशयित गायकवाड याच्याकडून २३ मोबाईल जप्त केले आहेत. या मोबाईलवरून व ई-मेल आणि फेसबुकवरून त्याने आतापर्यंत कोणते संदेश (मेसेज) पोस्ट केले आहेत, त्याची माहिती हे पथक स्वतंत्रपणे तपास करून घेत आहे. ---------------------