पेठ : सावित्रीबाई फुले विद्यापीठ क्र ीडा व शारीरिक शिक्षण मंडळ, डांग सेवा मंडळ व दादासाहेब बीडकर महाविद्यालय पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन क्र ॉसकंट्री क्र ीडा स्पर्धा संपन्न झाल्या. मुलांमध्ये हरसूल महाविद्यालयाचा दिनकर महाले, तर मुलींमध्ये केटीएचएम महाविद्यालयाच्या शीतल भगत हिने प्रथम क्र मांक मिळविला.धावपटू कविता राऊत यांच्या हस्ते स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. प्रशिक्षक विजयेंद्र सिंग, डांग सेवा मंडळाच्या अध्यक्ष हेमलता बीडकर, विजय बीडकर, श्रावण म्हसदे, मृणाल जोशी, महेश तुंगार उपस्थित होते. आर. बी. टोचे यांनी प्रास्ताविक केले. कविता राऊतचे प्रशिक्षक विजयेंद्र सिंग यांनी नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन केले. नरेंद्र पाटील यांनी संपूर्ण स्पर्धांचे आयोजन केले. परीक्षक म्हणून दत्ता शिंपी, दिलीप लोंढे, सुनील मोरे, नितीन अहिरराव, प्रदीप वाघमारे, तानाजी कांडेकर, मोहिनी पगार आदींनी काम पाहिले.आंतरमहाविद्यालयीन क्र ॉसकंट्री स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील ४१ महाविद्यालयांच्या जवळपास २२२ नवोदित खेळाडूंनी सहभाग नोंदविला. दरम्यान, विभागीय स्पर्धा मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संचलित कला महाविद्यालय, त्र्यंबकेश्वर येथे दि. २७ आॅगस्ट रोजी आयोजित करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत मुलांमध्ये नऊ, तर मुलींमध्ये सात स्पर्धकांना विभागीय पातळीवरच्या स्पर्धांमध्ये सहभागाची संधी देण्यात येणार आहे.
पेठला आंतरमहाविद्यालयीन क्र ॉसकंट्री स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 11:29 PM