दरवर्षी जानेवारी महिन्यात नदी खळखळून वाहते व उन्हाळ्यात नदी आटून जशी समस्या निर्माण होते, तशी परिस्थिती यंदा जानेवारीतच झाली आहे. या वर्षी धरण क्षेत्रातून पाण्याचा विसर्गच सोडला नसल्याने नदीचे पाणी दुर्गंधीयुक्त झाले आहे. या पाण्यावर प्रक्रिया करूनच भगुर नगरपालिकेला पाणीपुरवठा केला जात असला, तरी धरणातील पाणी नदीत लवकर सोडले नाही, तर शहराला घाण पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. दारणा नदीतून लष्करासाठी बांधलेल्या बंधाऱ्यात पाणी साठविण्यात आल्याने देवळाली कॅम्प, लष्करी भागाला मुबलक व स्वच्छ पाणी मिळत आहे. मात्र, भगुरला पाणीसमस्या निर्माण झाली आहे. शासनाने दारणा धरणातून नदीत पाणीपुरवठा करून मुबलक पाणी द्यावे, अशी मागणी विजय सोनवणे, नरेंद्र गायकवाड, प्रदीप साळवे, बाळू महाले, श्याम भागवत, संतोष भालेराव यांनी केली आहे.
कोट===
भगुर दारणा नदीत घाण पाणी असल्याने गावाला स्वच्छ पाणी देण्यासाठी फिल्टेशन प्लांटमध्ये पाणी स्वच्छतेसाठी नेहमीपेक्षा जास्त प्रक्रिया करावी लागत आहे. येत्या चार दिवसांत पाटबंधारे खाते दारणा धरणातून नदीत पाणी विसर्ग करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
- रवींद्र संसारे, भगुर पाणीपुरवठा अधिकारी
(फोटो ०८ दारणा)